South Africa Tour Of India: भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) कोरोनावर मात करण्यास अपयशी ठरल्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. तर, पाठिच्या दुखापतीमुळं दीपक हुडा (Deepak Hooda) या मालिकेला मुकणार आहे. याशिवाय, भारतीय संघ व्यवस्थापनानं हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय.या मालिकेतून विश्रांती देण्यात आलेल्या हार्दिक पांड्याच्या जागी शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) संघात समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) अद्याप अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येत्या 28 सप्टेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, पाठिच्या दुखापतीमुळं दिपक हुडा मालिकेतून बाहेर पडलाय. तर, हार्दिक पांड्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राष्ट्रीय निवड समिती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचा संघात समावेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या सुत्राच्या हवाल्यानं पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, "मोहम्मद शामी अजूनही कोरोनातून सावरला नाही. त्याला आणखी वेळ हवाय. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी शमीच्या जागी उमेश यादव संघाचा भाग असेल."


कुधी कुठं रंगणार भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहेत. पहिला सामना उद्या म्हणजेच 28 सप्टेंबरला तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. तर, दुसरा टी-20 सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आणि तिसरा टी-20 सामना 4 ऑक्टोबरला इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार, तिन्ही सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील.


दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि श्रेयस अय्यर (संभाव्य).


हे देखील वाचा-