IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना, मालिकाविजयासाठी भारत सज्ज!
IND vs ZIM : भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट रोजी हेरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे खेळला जाणार आहे.
India Tour Of Zimbabwe: तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत भारतानं (ZIM vs IND) मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट रोजी हेरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात झिब्बावेच्या संघाला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. तसेच या सामन्यात भारतीय संघ नव्या खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे.
केएल राहुलच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष
तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष असेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतानं दहा विकेट्सनं विजय मिळवला. ज्यामुळं त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. तो फक्त एक धाव करून माघारी परतला. यामुळं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुल कशी कामगिरी बजावतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे, केएल राहुल आगामी आशिया चषकात भारतीय संघाचा भाग आहे. यापूर्वी त्याचं फॉर्ममध्ये परतणं भारतासाठी गरजेचं आहे.
कधी, कुठे पाहणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना 22 ऑगस्टला सोमवारी खेळवला जाईल. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला दुपारी 12.45 वाजता सुरू होईल. याच्या अर्ध्यातासपूर्वी नाणेफेक होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह प्रसारण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तर, या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता.
संघ-
भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.
झिम्बाब्वेचा संघ:
रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.
हे देखील वाचा-
Sanju Samson: 'मॅन ऑफ द मॅच' जिंकताच संजू सॅमसनची खास क्लबमध्ये एन्ट्री! यादीत धोनी अजूनही अव्वल
Deepak Hooda: दिपक हुडा टीम इंडियासाठी ठरतोय लकी! सलग 16 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतानं मिळवलाय विजय