एक्स्प्लोर

तिसऱ्या टी20 मध्ये भारताच्या प्लेईंग 11 मध्ये बदल निश्चित, युवा खेळाडूला मिळू शकते संधी

IND vs WI 3rd T20, Team India Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज तिसरा टी20 सामना होत आहे

IND vs WI 3rd T20, Team India Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज तिसरा टी20 सामना होत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संगाला पराभवाचा सामना करावा लागला होता. फलंदाजीमुळे भारतीय संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात विडिंजने 4 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या टी20 सामन्यात दोन विकेटने विडिंजने बाजी मारली होती. आता तिसरा सामना जिंकून मालिकेत बाजी मारण्याचा विडिंजचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकून कमबॅक करण्याचा हार्दिक आणि संघाचा विचार असेल. तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामी जोडी बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय अक्षर पटेल, रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनाही वगळण्यात येण्याची शक्यता आहे. 

यशस्वी जायसवाल करु शकतो पदार्पण -  

तिसऱ्या टी20 सामन्यात युवा  यशस्वी जायसवाल पदार्पण करण्याची शक्यता आहे. यशस्वी जायस्वाल याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले होते. त्यानंतर कसोटीमध्येही त्याने संधीचे सोनं केले होते. त्यामुळे आता टी 20 मध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल सलामीला उतरु शकतात. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल खेळण्याची शक्यता आहे. 

टीम इंडियात अनेक बदल होण्याची शक्यता - 

दोन्ही सामन्यात पराभव झाल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.  मुकेश कुमार याच्या जागी आवेश खान अथवा उमरान मलिक यांना संधी मिळू शकते.  रवि बिश्नोई याच्या जागी कुलदीप यादवचे पुनरागमन होईल. 

हार्दिक आणि अर्शदीप यांनी दुसऱ्या सामन्यात भेदक मारा केला होता. दोघांचाही चेंडू स्विंग होत होता. दोन महिन्यानंतर मैदानात उतरलेला चहलही प्रभावी वाटत होता. पण रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनी प्रभावी कामगिरी केली नाही. त्यामुळे या दोघांची सुट्टी होऊ शकते.  

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 9 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 

पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना केलाय. पहिल्या सामन्यात टीम इंडिया फक्त 145 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजचे 4 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 152 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजने दोन विकेटने जिंकला. अशा स्थितीत तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदलाची शक्यता आहे. 

तिसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11- 

ईशान किशन (विकेटकीपर), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन/अक्षर पटेल, कुलदीप यादव, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि युजवेंद्र चहल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
Abhishek Bachchan Never Bought An IPL Team: कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
MI vs PBKS IPL 2026: रोहित शर्मा OUT, दानिश मालेवार IN...; पंजाबविरुद्ध अशी असेल मुंबई इंडियन्सची Playing XI
रोहित शर्मा OUT, दानिश मालेवार IN...; पंजाबविरुद्ध अशी असेल मुंबई इंडियन्सची Playing XI
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
Embed widget