विराट कोहली नॉट आऊट 500, BCCI ची खास पोस्ट, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज 100 वा कसोटी सामना होत आहे. हा सामना विराट कोहलीसाठी खास आहे.
Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज 100 वा कसोटी सामना होत आहे. हा सामना विराट कोहलीसाठी खास आहे. कारण, किंग कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा क्रिकेटपटू बनेल. तो सचिन तेंडुलकर याच्यासोबत इतर खेळाडूंच्या यादीत विराजमान होणार आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयनेही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर विराट कोहलीच कौतुक होत आहे. बीसीसीआयनेही विराट कोहलीसाठी खास पोस्ट केली आहे.
प्रवासाचे कौतुक करण्यासाठी 500 कारणं. विराट कोहलीला भारतासाठी त्याच्या 500व्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अभिनंदन, असे ट्विट बीसीसीआयने केले आहे. या ट्विटसोबत विराट कोहलीचा एक फोटोही पोस्ट केला आहे. विराट कोहलीवर सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
500 reasons to admire the journey!
— BCCI (@BCCI) July 20, 2023
Congratulations to Virat Kohli on his 5️⃣0️⃣0️⃣th international match for #TeamIndia 🇮🇳🫡#WIvIND | @imVkohli pic.twitter.com/Y9lez80Q97
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज होणारा सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असेल. इतके सामने खेळणारा विराट कोहली दहावा खेळाडू होणार आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक सामने खेळला आह. सचिन तेंडुलकरने 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
500 & Counting 😃
— BCCI (@BCCI) July 20, 2023
Hear from #TeamIndia Head Coach Rahul Dravid and milestone man Virat Kohli ahead of a special occasion 👌🏻👌🏻#WIvIND | @imVkohli pic.twitter.com/cJBA7CVcOj
विराट कोहलीने आतापर्यंत 110 कसोटी, 274 वनडे आणि 115 वनडे असे एकूण 499 सामने खेळले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत 499 सामन्यातील 558 डावात फलंदाजी करताना 53.48 जबरदस्त सरासरीने 25461 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 75 शतके आणि 131 अर्धशतके आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 254* इतकी आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी -
सचिन तेंडुलकर- 664 सामने.
महेला जयवर्धने- 652 सामने.
कुमार संगाकारा- 594 सामने.
सनथ जयसूर्या- 586 सामने.
रिकी पाँटिंग- 560 सामने.
महेंद्र सिंह धोनी- 538 सामने.
शाहिद आफ्रिदी - 524 सामने
जॅक कॅलिस- 519 सामने.
राहुल द्रविड- 509 सामने
इंजमाम उल हक- 500 सामने.
विराट कोहली- 499 सामने
𝗚reatest-𝗢f-𝗔ll-𝗧ime blockbusters antaru ra babu! 🐐🔥
— SunRisers Hyderabad (@SunRisers) July 20, 2023
Our king plays for 🇮🇳 for the 500th time tonight! 🫡#ViratKohli pic.twitter.com/DKhk6jBAPH
KING👑 Virat Kohli🔥🥳🤩 plays💥 his 500th international ♥️game today🥳🥳
— 𝙿𝙰𝚁𝙰𝙼𝚄ᵛʲ ~ ᵛⁱʳᵃᵗ ᶠᵃⁿ (@paramu_vj) July 20, 2023
HappyMorningToAll ❤️#ViratKohli pic.twitter.com/MkkggAaOVJ
Virat Kohli all set to play 500th international match 👑
— VK 18 FAN (@Deba3264_) July 20, 2023
KOHLI RULES CRICKET#ViratKohli #ViratKohli𓃵pic.twitter.com/vWOCAqzv1z