एक्स्प्लोर

India vs Sri Lanka Test Schedule : BCCIची घोषणा अन् गिल ब्रिगेड सज्ज... श्रीलंकेत कसोटीचा महासंग्राम! तारीख, मैदान अन् वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर

India vs Sri Lanka Test Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

India vs Sri Lanka Test Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व तरुण स्टार फलंदाज शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आले आहे. ही कसोटी मालिका आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) चक्राचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ कोलंबोमध्ये 07 ऑगस्टपासून चार दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. श्रीलंकेच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि खेळाडूंना लय मिळवण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक (India vs Sri Lanka Test Schedule)

कसोटी मालिकेतील पहिला सामना प्रसिद्ध गाले स्टेडियमवर रंगणार आहे, तर दुसरा सामना कोलंबो येथील ऐतिहासिक सिंहलीज स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल.

पहिला कसोटी सामना : 15 ते 19 ऑगस्ट (2026) – गाले इंटरनॅशनल स्टेडियम, गाले

दुसरा कसोटी सामना : 23 ते 27 ऑगस्ट (2026) – सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC), कोलंबो

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ- (Team India Squad vs Sri Lanka Test Series)

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.

स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज साई सुदर्शन यांचे खेळणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. त्यांना या मालिकेत सहभागी होण्यासाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून (CoE) फिटनेस प्रमाणपत्र मिळवावे लागेल.

श्रीलंकेच्या संघाची प्रतीक्षा 

यजमान श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप या मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केलेली नाही. आपल्या घरच्या मैदानावर भारतीय संघाला रोखण्यासाठी श्रीलंका कोणता संघ निवडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाने यापूर्वी जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळला होता, मात्र तो सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नव्हता. श्रीलंकेविरुद्धची ही मालिका मात्र WTC चक्रात समाविष्ट आहे. गेल्या चक्रात भारतीय संघाला WTC च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नव्हता. त्यामुळे फायनलच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत करण्यासाठी भारतीय संघाला ही मालिका 2-0 अशी जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.

हे ही वाचा -

Team India Squad Vs Sri Lanka Test Series : भारताचा सर्वांत 'अनलकी' क्रिकेटर! 22 शतक, 28 अर्धशतक... तरीही श्रीलंकेविरुद्ध निवडकर्त्यांना 'हा' X-फॅक्टर दिसलाच नाही

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget