IND vs SA T20 Series : आयपीएलनंतर (IPL) जूनमध्ये होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसंदर्भात घोषणा केली. 9 जून ते 19 जून दरम्यान ही मालिका खेळवली जाणार आहे. भारतात होणाऱ्या या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील सामने दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू येथे खेळवले जाणार आहे. बीसीसीआयने शनिवारी ही घोषणा केली आहे.
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. 29 मे रोजी आयपीएल संपल्यानंतर दोन्ही संघ आगामी आंतरराष्ट्रीय मालिकेच्या तयारीला लागतील. या टी20 मालिकेच्या तयारीसाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंना फक्त 10 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
अलीकडेच भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. यामध्ये कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या दोन्ही मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आगामी टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे. तर भारतासाठी आत्मविश्वास पुन्हा कमावण्याची चांगली संधी आहे.
भारतासह दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. युवा खेळाडूंमध्ये डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सिन या खेळाडूंनी विशेष कामगिरी केली आहे. यासोबतच एडन मार्कराम, कागिसो रबाडा आणि डेव्हिड मिलर सारखे वरिष्ठ खेळाडूही आपापल्या संघासाठी सामने जिंकण्यात विशेष भूमिका बजावत आहेत.
आगामी टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे त्यांना आयपीएल खेळण्याचा मोठा फायदा मिळणार आहे. खेळाडूंना भारतीय परिस्थितीशी चांगले जुळवून घेण्यात मदत होईल. तसेच भारतीय मैदानाचा चांगला अनुभव मिळेल.
सामने कधी आणि कुठे खेळवले जातील?
- पहिला सामना : 9 जून, दिल्ली
- दुसरा सामना : 12 जून, कटक
- तिसरा सामना : 13 जून, विशाखापट्टणम
- चौथा सामना : 17 जून, राजकोट
- पाचवा सामना : 19 जून, बंगळुरू
महत्त्वाच्या इतर बातम्या :