Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad :  सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 72 चेंडू आणि नऊ गडी राखून पराभव केला. हैदराबादने यंदाच्या हंगमातील सलग पाचवा विजय नोंदवला आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर हैदराबादने दणक्यात पुनरागमन करत सलग पाच विजय मिळवले. यासह दहा गुण घेत हैदराबादने गुणतालिकेत दुसरं स्थान पटाकवले आहे. तर आरसीबीचा हा तिसरा पराभव आहे. आठ सामन्यात आरसीबीने पाच विजय मिळवले आहे. या पराभवासह आरसीबी गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.... पाहूयात आरसीबी आणि हैदराबाद सामन्यातील महत्वाचे दहा मुद्दे...


हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघात कोणतेही बदल नाही.... मागील सामन्यातील प्लेईंग 11 कायम... 


मार्को जानसन आणि नटराजन यांच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीचा संपूर्ण संघ 16.1 षटकात 68 धावांत संपुष्टात आला. 


सुयेश प्रभुदेसाईनं आरसीबीकडून सर्वाधिक धावा केल्या. सुयेश प्रभुदेसाईने 15 धावांची खेळी केली.  


दुसऱ्याच षटकात आरसीबीचे आघाडीचे तिन्हीही फलंदाज माघारी परतले. विराट कोहली आणि अनुज रावत यांनाही एकाही धाव काढता आली नाही. तर फाफ डु प्लेसिस 5 धावा काढून बाद झाला. 30 धावांच्या आत आघाडी तीन फलंदाज बाद.


हैदराबादच्या गोलंदाजीसमोर आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. आरसीबीकडून फक्त सहा चौकार लगावण्यात आले. यात मॅक्सेवलने दोन तर फाफ डु प्लेसिस, सुयेश प्रभुदेसाई, शाबाज अहमद आणि वानंदु हसरंगा यांन प्रत्येकी एक एक चौकार लगावले. 


आरसीबीच्या आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. विराट कोहली अनुज राव आणि दिनेश कार्तिक शून्य धावसंख्येवर बाद झाले. तर फाफ डु प्लेसिस 5, शाबाज अहमद 7, हर्षल पटेल 4, वानंदु हसरंगा 8, मोहम्मद सिराज 2 धावा काढून बाद झाले. 


आरसीबीच्या फलंदाजापेक्षा अतिरिक्त धावसंख्या जास्त होत्या. आरसीबीला अतिरित्क 12 धावा मिळाल्या. त्याबळावर आरसीबीने 60 धावांचा टप्पा पार केला, असे म्हटल्यास वावगे वाटायला नको. 


पहिल्या षटकांपासून हैदाराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. मार्को जानसन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी तीन तीन बळी घेतले. तर जगतीश सुचितला दोन विकेट मिळाल्या. भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 


आरसीबीने दिलेले 69 धावांचं मापक आव्हान हैदराबादने आठ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले.


हैदराबादकडून अभिषेक शर्माने 47 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कर्णधान केन विल्यमसन 16 तर राहुल त्रिपाठी 7 धावा काढून नाबाद राहिला. आरसीबीकडून हर्षल पटेल याने एकमेव विकेट घेतली.