IND vs SA, 3rd Test Live: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SA, Day 2 Live : मालिका 1-1 बरोबरीत आहे. निर्णायक केपटाऊन कसोटी सामना जिंकणारा संघ मालिकेवर नाव कोरणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jan 2022 03:03 PM
दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला, भारताकडे 70 धावांची आघाडी

दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून भारताने दोन गडी गमावत 70 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या विराट आणि पुजारा क्रिजवर आहेत.

भारताला दोन मोठे झटके, सलामीवीर तंबूत

भारताचे सलामीवीर मयांक अगरवाल आणि केएल राहुल दोघेही स्वस्तात माघारी परतले आहेत. राहुल 10 तर मयांक 7 धावा करु शकला आहे. रबाडा आणि मार्को यांनी या दोन विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव आटोपला, भारताकडे 14 धावांची आघाडी

जसप्रीत बुमराहने पाचवी विकेट घेत आफ्रिकेचा अखेरचा गडी तंबूत धाडला आहे. आफ्रिकेचा संघ 209 धावांवर सर्वबाद झाल्यामुळे भारताकडे अजूनही 14 धावांची आघाडी आहे.

बुमराहने घेतला चौथा बळी, दक्षिण आफ्रिकेचे 9 गडी तंबूत

बुमराहने आणखी दोन गडी बाद केले असून दक्षिण आफ्रिकेचे 9 गडी आतापर्यंत तंबूत गेले आहेत.

बुमराहची अफलातून गोलंदाजी, मार्कोला धाडलं तंबूत

जसप्रीत बुमरहाने दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का दिला असून मार्को जेन्सन याला त्रिफळाचित करत तंबूत धाडलं आहे.

शमीची भेदक गोलंदाजी, दोन गडी धाडले माघारी

भारताला विकेट्सची अत्यंत गरज असताना मोहम्मद शमी याने दक्षिण आफ्रिकेचे दोन गडी बाद करत भारताला यश मिळवून दिलं आहे. शमीने बावुमा आणि कायल यांना बाद केलं आहे.

उमेश यादवला दुसरं यश, आफ्रिकेचा चौथा गडी बाद

दक्षिण आफ्रिकेचा चौथा गडी बाद झाला आहे. रुसी व्हॅन डर ड्यूसेन याला उमेश यादवने बाद केलं असून कोहलीने त्याचा झेल घेतला आहे.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला

दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिका संघाने दोन विकेट गमावल्या.  पहिल्या सत्राअखेर दक्षिण आफ्रिका संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 100 धावा केल्या आहेत. के. पीटरसन 40 धावांवर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अद्याप 123 धावांनी पिछाडीवर आहे. 

72 धावांवर दक्षिण आफ्रिकेचे 3 गडी बाद

तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात होताच बुमराह आणि यादव यांनी एक एक गडी बाद करत आफ्रिकेचे तीन गडी तंबूत धाडले आहेत.

सामना रंगतदार अवस्थेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. भारतीय संघाकडे सध्या 167 धावांची आघाडी आहे. दक्षिण आफ्रिकाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा केल्या आहेत. दुसरा दिवस निर्णायक ठरणार आहे. 

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा

दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. दुसऱ्या दिवशी बुमराहने पहिले यश मिळवून दिले. बुमराहने मार्करमला माघारी धाडले तर उमेश यादवने केशव महाराजला बाद केलं. दक्षिण आफ्रिकाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा केल्या आहेत. 

पार्श्वभूमी

IND Vs SA 3rd Score Live : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये (Cape Town) तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव करत दक्षिण आफ्रिका संघाने हिशोब चुकता केला. तीन सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. कर्णधार विराट कोहलीने नामेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 223 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल पहिल्या मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला बुमराहने पहिला धक्का दिला होता. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघाकडे मालिका जिंकण्याची समान संधी आहे. 


दरम्यान, भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झालीय. भारतानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. भारताला दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.  भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. हॉटस्टारवरही हा सामना लाइव्ह पाहता येणार आहे.
 
संघ-
भारताचा प्लेईंग इलेव्हन– केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव


दक्षिण आफ्रिकेचा प्लेईंग इलेव्हन– डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकिपर), मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.