एक्स्प्लोर

Ind vs Sa 2nd ODI : पुन्हा रोहित शर्मा अन् विराट कोहली द. आफ्रिकेला धू धू धुणार; दुसरा वनडे सामना कधी अन् कुठे रंगणार?, A टू Z माहिती

Ind vs Sa 2nd Raipur ODI Update News : कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने वनडे मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले.

India vs South Africa, 2nd ODI : कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने वनडे मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुनरागमनाने संघाचा आत्मविश्वास उंचावला आणि वातावरणच बदलून गेले. 

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात भारताने विजयाने केली. कोहलीने शतक ठोकत धमाका केला, तर रोहितने षटकारांचा जागतिक विक्रम मोडीत काढत धडाकेबाज खेळी खेळली. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर आता दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे. 3 डिसेंबरला रायपुरमध्ये पुन्हा एकदा रोहित-विराट अॅक्शनमध्ये दिसतील.

30 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या मालिकेचा पहिला सामना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या गावी रांची येथे झाला. विराट कोहलीच्या शतकासह रोहित शर्माचे 57 धावा आणि कर्णधार केएल राहुलची अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर भारताने 8 बाद 349 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका 332 धावांत ऑलआउट झाली आणि भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला.

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे कधी आणि कुठे?

रांचीचा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता रायपुर आणि त्यानंतर विशाखापट्टणमकडे रवाना होणार आहे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीमुळे बाहेर असल्याने या मालिकेसाठी केएल राहुलकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. गिल मान दुखापतीतून सावरत आहेत तर अय्यर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पोटाच्या दुखापतीनंतर पुनर्वसनात आहे.  

IND vs SA वनडे मालिकेचा थेट प्रसारण कुठे पाहू?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केली जात आहे. रायपुरमधील सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. चाहत्यांना सामन्यांची लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा/हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवरही पाहता येईल.

भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कॅप्टन, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, रुबिन हरमन, केशव महाराज, टोनी डी झॉर्झी, रायन रिकेल्टन, मार्को जॅन्सन, एडन मार्कराम, लुंगी एनगिडी, प्रेनेलन सुब्रायन

हे ही वाचा -

IND vs SA : ड्रेसिंग रूममध्ये रोहित अन् गंभीरमध्ये झाला वाद? सोशल मीडियावर फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या सत्य

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
लॉर्ड्सवर 388 धावांचा पाठलाग करणं शक्य? एकदिवसीय सामन्यात भारताने पाठलाग केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?  
लॉर्ड्सवर 388 धावांचा पाठलाग करणं शक्य? एकदिवसीय सामन्यात भारताने पाठलाग केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?  
लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा

व्हिडीओ

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Embed widget