एक्स्प्लोर

बाबर असो की आफ्रिदी, 7 पॉईंट्समधून समजून घ्या भारताच्या विजयाची कारणं!

IND vs PAK Match Prediction : विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज अटीतटीचा सामना होणार आहे.

IND vs PAK Match Prediction : विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यामध्ये आज अटीतटीचा सामना होणार आहे. नरेंद्र मोदी स्टोडिअमवर (Narendra Modi Stadium) पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांचा आमना सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा (IND WON) विजय निश्चित मानला जातोय. प्रत्येक फॅक्टर भारताच्या विजयाच्या बाजूने इशारा करत आहे. त्यामुळे आजच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा विजय निश्चित मानला जातोय. त्याची सात कारणे आहेत. पाहूयात त्याबाबत

कारण नंबर-1 : 

विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा आतापर्यंत सातवेळा पराभव केला आहे. पाकिस्तानला एकदाही भारताचा पराभव करता आला नाही. 1992 ते 2019 यादरम्यान सातवेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आज विश्वचषकातील आठवा सामना या दोन्ही संघामध्ये होत आहे. विजय रथ कायम ठेवण्यासाठीच भारत मैदानात उतरणार आहे.

कारण नंबर-2: 

विश्वचषकात भारताने आतापर्यंत 86 सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने 55 सामने जिंकले आहेत. भारताच्या विजायाची टक्केवारी 65 इतकी आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाने विश्वचषकात 81 सामने खेळलेत, यामध्ये 47 जिंकले आहेत. पाकिस्तानच्या विजयाची टक्केवारी 59 इतकी आहे. भारतीय संघाची विश्वचषकातील कामगिरी सरस आहे. 

कारण नंबर-3: 

विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना असला की खेळाडूंवर अतिरिक्त दबाव असतो. हाच दबाव गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये दिसून येतो. इतकेच नाही तर फिल्डिंग करतानाही दिसतो. विश्वचषकात पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताच्या फलंदाजांचे झेल सोडले आहेत.  पाकिस्तानचे फलंदाजही दबावात आहेत. 

कारण नंबर-4: 

भारतीय संघ होम ग्राऊंडवर खेळत आहे. अमहदाबादच्या खेळपट्टीला भारतीय खेळाडू चांगल्या पद्धतीने ओळखतात. घरच्या परिस्थितीचा फायदा टीम इंडियाला नक्कीच मिळाले. त्याशिवाय एक लाख चाहत्यांचा सपोर्ट टीम इंडियाच्या बाजूने असेल. 

कारण नंबर-5: 

ICC  वनडे क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.  

कारण नंबर-6: 

भारताची फलंदाजी पाकिस्तानच्या तुलनेत खूप मजबूत आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या हे सर्व तुफान फॉर्मात आहे. रोहित, विराट आणि राहुल यांनी मागील दोन्ही सामन्यात धावांचा पाऊस पाडला आहे. पाकिस्तानची फलंदाजी सध्या फक्त मोहम्मद रिजवान याच्यावर अवलंबून आहे. कर्णधार बाबर आझम याला अद्याप मोठी खेळी करता आली नाही.

कारण नंबर-7: 

जसप्रीत बुमराहचे संघात कमबॅक, ही भारतीय संघाची जमेची बाजू आहे. बुमराहमुळे भारतीय गोलंदाजी अधिक भेदक आणि आक्रमक झाली आहे. फिरकीमध्ये कुलदीप, जड्डू आणि अश्विन यांच्याकडे तगडा अनुभव आहे. भारताच्या गोलंदाजीत संतुलन दिसत आहे. पाकिस्तानकडे वेगवान गोलंदाज दर्जेदार आहेत, पण फिरकी गोलंदाजी कमकुवत आहेत. 
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hyderabad Liberation Day : सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
Loan : अचानक पैशांची गरज लागल्यास कोणतं कर्ज फायदेशीर ठरत?  वैयक्तिक कर्ज की टॉप अप लोन? जाणून घ्या
अचानक पैशांची गरज लागल्यास कोणतं कर्ज फायदेशीर ठरत? वैयक्तिक कर्ज की टॉप अप लोन? जाणून घ्या
धक्कादायक! धाड..धाड.. साताऱ्यात भर रस्त्यात एकावर गोळीबार, दुचाकीवरुन आलेले हल्लेखोर फरार
धक्कादायक! धाड..धाड.. साताऱ्यात भर रस्त्यात एकावर गोळीबार, दुचाकीवरुन आलेले हल्लेखोर फरार
Asia Cup 2025 : हस्तांदोलन वादानंतर पाकिस्तानच्या कॅप्टनचा आणखी एक निर्णय, UAE विरुद्धच्या मॅचपूर्वी सलमान आगानं काय केलं?
हस्तांदोलन वादानंतर पाकिस्तानच्या कॅप्टनचा आणखी एक निर्णय, सलमान आगानं नेमकं काय केलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hyderabad Liberation Day : सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
Loan : अचानक पैशांची गरज लागल्यास कोणतं कर्ज फायदेशीर ठरत?  वैयक्तिक कर्ज की टॉप अप लोन? जाणून घ्या
अचानक पैशांची गरज लागल्यास कोणतं कर्ज फायदेशीर ठरत? वैयक्तिक कर्ज की टॉप अप लोन? जाणून घ्या
धक्कादायक! धाड..धाड.. साताऱ्यात भर रस्त्यात एकावर गोळीबार, दुचाकीवरुन आलेले हल्लेखोर फरार
धक्कादायक! धाड..धाड.. साताऱ्यात भर रस्त्यात एकावर गोळीबार, दुचाकीवरुन आलेले हल्लेखोर फरार
Asia Cup 2025 : हस्तांदोलन वादानंतर पाकिस्तानच्या कॅप्टनचा आणखी एक निर्णय, UAE विरुद्धच्या मॅचपूर्वी सलमान आगानं काय केलं?
हस्तांदोलन वादानंतर पाकिस्तानच्या कॅप्टनचा आणखी एक निर्णय, सलमान आगानं नेमकं काय केलं?
आवं कुठं? आपल्या पुण्यात; पहिल्यांदाच पुण्यातील बसडेपोत धावली डबलडेकर बस, प्रवाशांनी घेतला आनंद
आवं कुठं? आपल्या पुण्यात; पहिल्यांदाच पुण्यातील बसडेपोत धावली डबलडेकर बस, प्रवाशांनी घेतला आनंद
जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
Internet Cable Owner : सागरी इंटरनेट केबल्समुळं संपूर्ण जग जोडलं जातं, ऑप्टिकल फायबर केबल्सची मालकी कुणाकडे? उत्तर जाणून बसेल आश्चर्याचा धक्का
समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबलचं मालक कोण असतं? जाणून घ्या 
महाराष्ट्रात  पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
महाराष्ट्रात पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
Embed widget