IND vs PAK LIVE Score : पाकिस्तानचा धुव्वा, भारताचा तब्बल 228 धावांनी विजय

IND vs PAK Asia Cup 2023 LIVE : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा थरार होणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 11 Sep 2023 10:57 PM
पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव

विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या दमदार शतकी खेळीनंतर कुलदीप यादव याने भेदक गोलंदाजी केली. भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 128 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला.

कुलदीपचा पंच, पाकिस्तानला आठवा धक्का

कुलदीपचा पंच, पाकिस्तानला आठवा धक्का बसलाय. 

कुलदीपचा विकेटचा चौकार

कुलदीप यादव याने पाकिस्तानला दिला सातवा धक्का.... कुलदीपची चौथी विकेट

पाकिस्तानचे सहा फलंदाज तंबूत

कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात पाकिस्तानचा संघ अडकला आहे. कुलदीप यादव याने पाकिस्तानचे तीन फलंदाज तंबूत धाडले. पाकिस्तानने सहा बाद 119 धावा केल्यात.

पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत

पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली आहे. कुलदीप यादव याने पाकिस्तानला पाचवा धक्का दिला. 100 धावांच्या आत पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतलाय.

रविंद्र जाडेजाच्या चंडूवर सलामान आगा जखमी

रविंद्र जाडेजाचा चेंडू स्विप करण्याच्या प्रयत्नात सलामान आगा जखमी झाला. त्याच्या डोळ्याजवळ इजा झाली. चेंडू लागला तेथून रक्तही आले. मैदानावर फिजिओ दाखल झाले आहेत. सामना काहीवेळासाठी थांबवण्यात आलाय. 

पाकिस्तानला चौथा धक्का

कुलदीप यादवने पाकिस्तानला दिला चौथा धक्का... फखर जमान बाद झाला. 

शार्दूलची कमाल, पाकिस्तानला दिला तिसरा धक्का

शार्दूल ठाकूर याने पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. मोहम्मद रिझवानला 2 धावांवर पाठवले तंबूत

एकही षटक कमी नाही

पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला होता, पण सामन्याचे एक षटकही कमी न करण्याचा निर्णय पंचांनी घेतलाय. 

9.20 वाजता सामन्याला सुरुवात होणार

9.20 वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात होणार आहे. 

Asia Cup 2023 : पावसानंतर सामना सुरु झाला तर पाकिस्तानला किती टार्गेट मिळणार?

डकवर्थ लुईस नियमांनुसार, जर पाकिस्तान संघाला 20 षटके फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर 200 धावांचे आव्हान मिळू शकते. म्हणजे, पाकिस्तानला आणखी 9 षटकात 156 धावा कराव्या लागतील. डकवर्थ लुईस नियमांनुसार, पाकिस्तानला 22 षटकात 226 धावांचे आव्हान मिळू शकते. तर 24 षटकानंतर 230, 26 षटकात 244 धावांचे आव्हान मिळू शकते. 25 षटकांमध्ये 237 धावांचे आव्हान मिळू शकते. तर 30 षटकांत 267 धावांचे आव्हान मिळू शकते. 10.30 पर्यंत सामना सुरु झाल्यास 20 षटकांचा सामना होऊ शकतो. 

विराट-राहुलचे आयीसीने केले कौतुक

पाऊस थांबला अन् षटके कमी झाल्यास पाकिस्तानला कितीचे आव्हान मिळणार?

पावसाची विश्रांती, थोड्याच वेळात सामना होणार

पावसाची विश्रांती, थोड्याच वेळात सामना होणार... पंच मैदानाची पाहणी करतील, त्यानंतर सामन्याला सुरुवात होणार आहे.

पावसाच्या एन्ट्रीने खेळ थांबवला. पाकिस्तान 11 षटकानंतर दोन बाद 44 धावा

पावसाच्या एन्ट्रीने खेळ थांबवला. पाकिस्तान 11 षटकानंतर दोन बाद 44 धावा 

पाकिस्तानला मोठा धक्का, बाबर आझम 10 धावांवर त्रिफळाचित; पाकिस्तान दोन बाद 43 धावा

हार्दीक पांड्या याने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. बाबर आझम याला 10 धावांवर त्रिफळाचित केले; पाकिस्तान दोन बाद 43 धावा 

पाकिस्तानची सावध सुरुवात

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली आहे. बाबर आझम आणि फखर जमान संभाळून खेळत आहेत. 9 षटकानंतर पाकिस्तान एक बाद 98 धावा

पाकिस्तानला पहिला धक्का

जसप्रीत बुमराहने पाकिस्तानला दिला पहिला धक्का, इमाम 9 धावांवर बाद

पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुवात

जसप्रीत बुमराह पहिले षटक घेऊन आलाय. फखर जमान आणि इमाम फलंदाजीसाठी मैदानात .... पाकिस्तानला विजयासाठी 357 धावांचे आव्हान

पाकिस्तानपुढे 357 धावांचे आव्हान

IND Vs PAK, Innings Highlights : केएल राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. राहुल आणि विराट कोहली यांनी दमदार शतके झळकावली. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके ठोकली. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात 2 विकेटच्या मोबदल्यात 356 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली 122 तर केएल राहुल 111 धावांवर नाबाद होते. पाकिस्तानची गोलंदाजी भारताच्या फलंदाजापुढे फिकी पडली.

नसीम शाह दुखापतग्रस्त

नसीम शाह दुखापतग्रस्त झालाय. त्यामुळे इफ्तिखार अहमद आला गोलंदाजीला

राहुल-विराटची द्विशतकी भागिदारी

राहुल-विराटची द्विशतकी भागिदारी पूर्ण झाली आहे. 

राहुलनंतर विराट कोहलीचेही शतक

केएल राहुलनंतर विराट कोहलीनेही दमदार शतक ठोकलेय. विराट कोहलीने 84 चेंडूत शतक ठोकलेय. 

विराट कोहलीच्या 13 हजार धावा पूर्ण

विराट कोहलीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.

केएल राहुलचे दमदार शतक

केएल राहुल याने दमदार शतक झळकावले. राहुल याने 100 चेंडूत 100 धावांची खेळी केली. 

भारतीय संघाच्या 300 धावा पूर्ण

विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 300 धावांचा टप्पा पार केला आहे. 

केएल राहुल-विराट कोहलीची शतकाकडे वाटचाल

केएल राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. दोघांनीही शतकाकडे वाटचाल सुरु केली आहे.

विराट-राहुलची दीडशतकी भागिदारी

विराट कोहली आणि राहुल यांनी 149 चेंडूत दीडशतकी भागिदारी केली आहे. विराट कोहली 76 तर राहुल 78 धावांवर खेळत आहे.

विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने 55 चेंडूत अर्धशतक ठोकले. विराट कोहलीचे वनडेतील 67 वे अर्धशतक होय... 

किंग इज बॅक

विराट कोहलीने यंदाच्या वर्षात एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 





विराट-राहुलची शतकी भागिदारी


राहुल आणि विराट कोही यांनी शतकी भागिदारी केली आहे.

केएल राहुलचं अर्धशतक

केएल राहुल याने दमदार कमबॅक केलेय. केएल राहुल याने 60 चेंडूत अर्धशतक ठोकलेय. भारतीय संघाने 33.1 षटकात दोन बाद 205 धावा केल्या आहेत. 

टीम इंडियाचे द्विशतक, राहुल-विराटची दमदार फलंदाजी

भारतीय संघाच्या 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजाची धुलाई केली.

राहुल-विराटची दमदार फलंदाजी

विराट कोहली आणि केएल राहुल यांची दमदार फलंदाजी सुरु आहे. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली आहे. केएल राहुल याने चौफेर फटकेबाजी करत भारताची धावसंख्या वाढवली.

पाकिस्तानचे दोन्ही DRS संपले

पाकिस्तान संघाचे दोन्ही डीआरएस संपले आहेत. विराट कोहलीसाठी पाकिस्तान संघाने दुसरा डीआरएस घेतला, पण विराट कोहली याला तिसऱ्या पंचांनीही नाबाद दिले. आता पाकिस्तानकडे एकही डीआरएस राहिलेला नाही.

सामन्याला सुरुवात

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. विराट आणि राहुल मैदानावर परतले आहेत. शादाब खान गोलंदाजीसाठी तयार

पाकिस्तानला धक्का, हॅरिस रौफ दुखापतग्रस्त

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. सामना सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानला धक्का बसलाय. हॅरिस रौफ दुखापतग्रस्त झालाय. हॅरिस रौफ आज गोलंदाजी करु शकणार नाही.

हॅलोजनचा वापर करत खेळपट्टी सुखवली

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वारंवार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेळपट्टी आणि मैदानात अतिप्रमाणात ओलावा होता. त्यामुळे ग्राऊंड स्टाफने चक्क हॅलोजनचा वापर करत खेळपट्टी सुखवली. मैदानाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरु झालाय. 


 


 





भारत-पाकिस्तान सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात

पंचांनी मैदानाची पाहणी केली. 4.40 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. विराट कोहली आणि केएल राहुल फलंदाजीला मैदानात उतरणार 





पंच थोड्याच वेळात करणार मैदानाची पाहणी

पंच थोड्याच वेळात मैदानाची पाहणी करणार आहेत. रोहित शर्मासह भारतीय खेळाडूही पाहणी करण्यासाठी मैदानावर गेले आहेत. 

Colombo Rain : पाऊस थांबला... भारत आणि पाकिस्तान सामना थोड्याच वेळात होण्याची शक्यता

Asia Cup 2023 IND vs PAK : पाऊस थांबला... भारत आणि पाकिस्तान सामना थोड्याच वेळात होण्याची शक्यता

पुन्हा पावसाला सुरुवात

IND vs PAK Weather Live : पुन्हा पावसाचा खेळ सुरु

पावसाची उघडझाप सुरु आहे. पावसामुळे सामना उशीराने सुरुवात होणार आहे.

कोलंबोमध्ये पावसाचा लपंडाव

कोलंबोमध्ये पावसाचा लपंडाव... सामन्याला उशीरा होणार सुरुवात

पावसामुळे सामना उशीरा सुरु होणार

कोलंबोमध्ये पावासमुळे भारत आणि पाकिस्तान सामन्याला उशीरा सुरुवात होणार आहे. 

कोलंबोत मुसळधार पावसाला सुरुवात झाली

कोलंबोत विराट कोहलीच किंग, मागील 3 डावात शतके, आजही मोठ्या खेळीची आपेक्षा

कोलंबोमध्ये आज राखीव दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे. रविवारी पावसामुळे सामना थांबवावा लागला होता. काल, जिथे सामना थांबला तेथूनच आज पुन्हा सुरु होणार आहे. रविवारी पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने दोन बाद 147 धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि केएल राहुल मैदानावर होते. आज विराट कोहली आणि राहुल डावाची सुरुवात करतील. विराट कोहलीकडून आज मोठ्या खेळीची आपेक्षा सर्वांनाच आहे. विराट कोहलीसाठी कोलंबोचं मैदान लाभदायी आहे. या मैदानवर विराट कोहलीने 100 पेक्षा जास्त सरासरीने धावा चोपल्या आहेत. आजही विराट कोहलीकडून चाहत्यांना शतकाची आपेक्षा असेल. मागील तीन डावात विराट कोहलीने या मैदानावर शतके झळकावली आहेत. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबोच्या मैदानावर सामना होत आहे. विराट कोहलीने कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर मागील तीन डावात तीन शतके ठोकली आहेत.  आज पुन्हा एकदा किंग कोहलीकडून चाहत्यांना शतकाची आपेक्षा असेल. कोलंबोच्या मैदानावर विराट कोहलीने मागील तीन डावात 128*, 131 आणि 111 धावा चोपल्या आहेत. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 

कोलंबोत पावसाला सुरुवात

कोलंबोमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसावरही पावसाचे सावट 





आजही सामना झालाच नाही तर टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहचणार..? पाहा संपूर्ण समीकरण 






भारत - पाकिस्तान सामना रद्द झाला तर...

सुपर 4 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. पाकिस्तान संघाने सुपर 4 मधील पहिला सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाकडे तीन गुण होतील. तर भारताचा हा पहिलाच सामना असल्यामुळे फक्त एक गुण असेल. असे असताना भारतीय संघ फायनलमध्ये कसा पोहचणार? याबाबत जाणून घेऊयात.. 

कोलंबोतील हवामान स्वच्छ, पावसाची शक्यता नाही

रविवारी काय झाले होतं ?

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बाबरचा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 100 चेंडूत 121 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने 49 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गिल याने 52 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले. आजच्या दिवशाचा सामना थांबला तेव्हा विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर फलंदाजी करत होते. भारतीय संघाने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत. उद्या, सोमवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उर्वरित सामना होणार आहे. रविवारी खेळ जिथे संपला तेथूनच आज सामन्याला सुरुवात होणार आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत, पावसाची शक्यता

सर्वात आधी फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघानं 24.1 षटकांत 2 विकेट्स गमावत 147 धावा केल्या. आता रिझर्व्ह डेच्या दिवशी भारतीय क्रिकेट संघ या धावसंख्येसह खेळायला मैदानात उतरेल. मात्र सोमवारीही कोलंबोतील हवामान फारसं चांगलं नसेल असा अंदाज श्रीलंकेतील हवामान विभागानं वर्तवला आहे. Accuweather नुसार, या दिवशी पावसाची शक्यता 99 टक्के आहे. म्हणजेच, आजही सामना होण्याची शक्यता अजिबातच नाही, असं म्हटलं जात आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताही 95 टक्के आहे. वाऱ्याचा वेग 41 किमी/तास असेल. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

आजही पाऊस पडला तर काय होईल?

टीम इंडिया रिझर्व्ह डे (11 सप्टेंबर) टीम इंडिया 24.1 षटकांच्या पुढे खेळण्यासाठी मैदानात उतरेल. पण हवामान पाहता चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, हा सामना होणार का? रिझर्व्ह डेलाही पावसानं गोंधळ घातला आणि सामना झालाच नाहीतर काय होईल? मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर रिझर्व्ह डेच्या दिवशीही पावसानं हजेरी लावली आणि सामना खेळवला गेलाच नाही, तर मात्र सामना रद्द केला जाईल. अशातच दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण दिला जाईल. 


नियमांनुसार, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्याचा निकाल देण्यासाठी दोन्ही डावांमध्ये किमान 20-20 षटकं खेळवली जाणं गरजेचं आहे. म्हणजेच, रिझर्व्ह डेच्या दिवशी जर पाऊस आलाच, तर सामन्याचा निकाल काढण्यासाठी पाकिस्तानला किमान 20 षटकं खेळवण्यासाठी प्रय्तन केला जाईल. त्यानंतरच डकवर्थ लुईस नियमानुसार, निकाल काढला जातो. पाकिस्तान टीम 20 ओव्हर्सही खेळू शकली नाही, तर मात्र सामना थेट रद्द केला जाईल. 

आजच्या दिवसाचा खेळ रद्द, उद्या होणार उर्वरित सामना

पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थांबवण्यात आला आहे. राखीव दिवशी म्हणजेच, उद्या सामन्याला पुन्हा सुरुवात होणार आहे. दुपारी 3 वाजता सामना पुन्हा सुरु होईल.

पुन्हा पावसाने हजेरी लावली

भारत आणि पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. 





9 वाजता सामन्याला सुरुवात झाल्यास 34 षटकांचा सामना असेल

आज सामना सुरु झाला नाही तर...

आज जिथे सामना संपला तेथूनच उद्या सामन्याला सुरुवात होईल. पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सामना आजच होण्याची शक्यता आहे.

सामना कधी होणार सुरु ?

पंच पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. 9 वाजता सामन्याला सुरुवात होण्याची शक्यता

पंच पाहणीसाठी मैदानावर

पंच पाहणीसाठी मैदानावर पोहचले आहेत... 

7.30 वाजता पंच करणार पाहणी

पावसानंतर खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी केली जाणार आहे. रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्यासोबत पंचांनी बातचीत केली. साडेसात वाजता पंच मैदानाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत.

सामन्याची कटऑफ वेळ 10.36

भारत-पाकिस्तान सामन्याची अश्विनलाही उत्कंठा

IND vs PAK Live: खराब आऊटफील्डमुळे सामना थांबलाय

कोलंबोमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. पण मुसळधार पावसामुळे मैदानाची आऊटफिल्ड खराब झाली आहे. कव्हर्स काढण्यात आले आहेत. मैदानाचे कर्मचारी आऊटफिल्ड सुकवली जात आहे.  

IND vs PAK Live : आज 20 षटकांचा खेळ झाला नाही तरच राखीव दिवसाचा वापर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण आजच सामना करण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला षटकं घटवण्यास सुरुवात झाली आहेत. पाकिस्तान संघाला आज कमीतकमी 20 षटके फलंदाजी देण्यात येईल. पाकिस्तानला 20 षटकात 181 धावांचे आव्हान असेल. पाकिस्तानला 20 षटके फलंदाजी करण्यास मिळाली नाहीत, तरच उद्या म्हणजेच राखीव दिवशी सामना होईल.  

भारत-पाकिस्तान सामन्याबाबत लेटेस्ट अपडेट

पावसाची विश्रांती

कोलंबोमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. कव्हर्स काढण्यात आले आहेत. पंच मैदानाची पाहणी करतील, त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. 





पावसाचा खोडा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तासभरापासून थांबला आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात व्यत्यय आलाय.





भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत आणि पाकिस्तान सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. भारताने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत. विराट कोहली 8 तर राहुल 17 धावांवर खेळत आहेत.

भारताला दुसरा धक्का, रोहित पाठोपाठ शुभमन गिल 58 धावांवर बाद

भारताला पाकिस्तानने दुसरा धक्का दिला आहे. रोहित पाठोपाठ शुभमन गिल 58 धावांवर बाद झाला आहे. 

भारताला पहिला धक्का; रोहित शर्मा बाद, 49 चेंडूत 56 धावांची दमदार खेळी,  भारत 16.4 षटकांत एक बाद 121 धावा

भारताला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा झेलबाद झाला आहे. त्याने 49 चेंडूत 56 धावांची दमदार खेळी साकारली.  भारत 16.4 षटकांत एक बाद 121 धावा

रोहित शर्माचे 50 वे अर्धशतक

रोहित शर्माने 50 वे अर्धशतक ठोकले. 





गिलपाठोपाठ रोहितचेही अर्धशतक

शुभमन गिल याच्यानंतर रोहित शर्मानेही अर्धशतक ठोकलेय.  42 चेंडूत ठोकले अर्धशतक

भारताचे शतक, गिल-रोहितची दमदार फलंदाजी

13.2 षटकात भारताचे शतक, गिल-रोहितची दमदार फलंदाजी

गिलचे दमदार अर्धशतक

पाकिस्तानविरोधात शुभमन गिल याने दमदार अर्धशतक झळकावले. 37 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले. 

भारताची आक्रमक सुरुवात

भारताची दमदार सुरुवात

भारताने 10 षटकामध्ये बिनबाद 61 धावा केल्या.. गिल 41 तर रोहित 18 धावांवर खेळत आहेत

गिल-रोहितची अर्धशतकी भागिदारी

शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांची आक्रमक सुरुवात... गिल आणि रोहित शर्मा यांनी बिनबाद 57 धावांची भागिदारी केली आहे.

गिल ऑन फायर

शुभमन गिल याने शाहीन आफ्रिदीची केली धुलाई.... एकाच षटकात लगावले तीन चौकार... शाहीन आफ्रिदीच्या तीन षटकात 31 धावा वसूल

भारताची आक्रमक सुरुवात

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली आहे. शाहीन आफ्रिदी आणि नसीम खान यांचा समाचार घेतला. रोहित शर्मा 10 तर गिल 13 धावांवर खेळत आहेत. 

गिल याला जीवनदान

शुभमन गिल याला पहिल्याच चेंडूवर जीवनदान मिळाले... शाहीन आफ्रिदीने झेल सोडला.

रोहित शर्माची षटकाराने सुरुवात

पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार मारत रोहितने दमदार सुरुवात केली.

रोहित शर्मा-गिल मैदानात

भारताच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि गिल मैदानात... शाहीन आफ्रिदी पहिले षटक टाकण्यासाठी तयार

भारतीय संघात दोन बदल - 

केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांचे टीम इंडियात कमबॅक झालेय. तर श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शामी यांना डच्चू देण्यात आलाय

IND vs PAK LIVE Score : नाणेफेकीचा कौल बाबर आझमने जिंकला

IND vs PAK LIVE Score : नाणेफेकीचा कौल बाबर आझमने जिंकला, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

मागील पाच सामन्यात काय झाले?

मागील पाच सामन्यापैकी तीन सामन्यात भारताची बाजी, पाकिस्तान एक... रद्द एक

IND Vs PAK Live : चाहत्यांसाठी गुड न्यूज

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला वेळेवर सुरुवात होणार आहे. कोलंबोत हवामान स्वच्छ आहे. सूर्यदेवाने दर्शन दिल्यामुळे सामन्याला वेळेवर सुरु होणार आहे. अडीच वाजता नाणेफेक होईल.

थोड्याच वेळात सामन्याला होणार सुरुवात

पाकिस्तानच्या कमकुवत बाजूचा भारत घेणार फायदा

Asia Cup 2023 : कोलंबोत भारताविरोधात होणाऱ्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान संघाने एकदिवस आधीच प्लेईंग 11 ची घोषणा केली. पाकिस्तानच्या संघात चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिलेय. पाकिस्तानच्या संघात फक्त एकमेव स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजाचा समावेश आहे. याच कमकुवत बाजूचा भारतीय संघ फायदा घेऊ शकतो. शादाब खान या एकमेव फिरकी गोलंदाजाला पाकिस्तान संघात स्थान मिळाले आहे. त्याच्या जोडीला दोन कामचलाऊ फिरकी गोलंदाज आहेत, याचाच फायदा भारतीय संघ घेऊ शकतो. 

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ मैदानावर पोहचले आहेत. 2.30 वाजता नाणेफेक होईल

ईशान किशनला प्लेईंग 11 मध्ये स्थान द्यावे

पाकिस्तानविरोधात साखळी सामन्यात ईशान किशन याने मोक्याच्या क्षणी 82 धावांची खेळी केली होती. त्यामुळे ईशान किशन याला प्लेईंग 11 मध्ये आजही संधी द्यायला हवी, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलेय. 

कोलंबोत विराटचा जलवा

कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर विराट कोहलीचा रेकॉर्ड चांगला आहे. विराट कोहलीने या मैदानावर मागील तीन सामन्यात शतके झळकावली आहेत. या मैदानावर विराट कोहलीची सरासरी 100 पेक्षा जास्त आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

रोहित-विराट जोडीही करणार विक्रम

विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी केल्यास पाच हजार धावा पूर्ण करणार आहेत. या जोडीने आतापर्यंत 85 डावात 62.47 च्या सरासरीने 4998 धावांची भागिदारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये आतापर्यंत 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी झाल्या आहेत. पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये पाच हजार धावांच्या भागिदारीचा विक्रम होऊ शकतो. 

विराट 13 हजार धावांचा टप्पा पार करणार






रोहित दहा हजार धावसंख्येच्या जवळ

भारतीय कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यापासून 78 धावा दूर आहे. हा टप्पा गाठणारा रोहित हा दुसरा वेगवान खेळाडू ठरू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने 205 डावांमध्ये पूर्ण केला. रोहितने आतापर्यंत 239 डावात 9922 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या आधी 14 खेळाडूंनी 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामध्ये सध्या खेळत असलेला विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर, कुमार संगाकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसुर्या, विराट कोहली, जयवर्धने, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, ख्रिस गेल, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान यांनी आतापर्यंत 10 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान थरार, पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा, वाचा एका क्लिकवर

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आयसीसी सामने वगळता इतर सामने होत नाही. त्यामुळे दोघांमधील लढत पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह वाढलेला असतो. भारतीय संघ चार वर्षानंतर पाकिस्तानविरोधात वनडेमध्ये दोन हात करत आहे. या सामन्यात कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतो, याकडे सर्वांची नजर असेलच.. पण पाच खेळाडूंच्या कामगिरीमुळे सामन्याचा निकाल बदलू शकतो. या आघाडीच्या पाच खेळाडूबद्दल जाणून घेऊय़ात... 

कोण मारणार बाजी? चाहत्यांमध्ये उत्साह

कुणाचे पारडे जड - 

भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटले की चाहत्याच्या नजरा सामन्याकडेच असतात. एक काळ असा होता की, भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी असा सामना असायचा... पण आता पाकिस्तानच्या तोडीस तोड भारताची गोलंदाजी आहे आणि भारताच्या फलंदाजीला आव्हान देणारी पाकिस्तानची फलंदाजी आहे. त्यामुळे सामना रंगतदार होईल.  जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज पाकिस्तानच्या गोलंदाजापेक्षा कमी नाहीत. पाकिस्तानची फलंदाजीही दमदार आहे.  बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा आणि इमाम उल हक शानदार फॉर्मात आहेत. इफ्तिखारही रंगात आहे. शनिवारी रोमांचक सामना होईल. दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत. 

लाईव्ह स्ट्रीम फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.

भारतात कधी पाहता येणार IND vs PAK हायव्होलटेज सामना?

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. 


 

दोन्ही संघाचे शिलेदार

आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.


आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ 
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रौफ.

साखळी फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्याचा लेखाजोखा 

शनिवारी, दोन सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. भारताची आघाडीची फळी 15 षटकांच्या आत तंबूत परतली होती. एकवेळ भारताची अवस्था 4 बाद 66 अशी दयनीय झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. भारतीय संघ 150 धावांपर्यंत पोहचणार का ? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जिगरबाज खेळी करत भारताचा डाव सावरला होता. हार्दिक पांड्याने 87 धावांची झुंजार खेळी केली होती. तर इशान किशन याने 82 धावांचे वादळी योगदान दिले होते. हार्दिक पांड्या आणि इशान किशन या जोडीने पाचव्या विकेटला 138 धावांची भागिदारी केली. हार्दिक आणि इशान या जोडीच्या बळावर भारतीय संघाने 266 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर पावसाने खोडा घातल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला भारतीय फलंदाज कसे तोंड देणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या वेगवान तिकडीने पहिल्या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ तंबूत धाडला होता. आता 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 

भारताविरोधात वनडेमध्ये बाबरची कामगिरी कशी राहिली ?

मागील पाच डावांत बाबर आझम याची भारताविरोधात कामगिरी कशी राहिली आहे.


2017 चॅम्पियन ट्रॉफी- 8 धावा


2017 चॅम्पियन ट्रॉफी- 46 धावा


2018 आशिया कप- 47 धावा


2018 आशिया कप- 9 धावा


2019 वर्ल्ड कप- 48 धावा

भारताविरोधात बाबर प्रभावहीन

बाबर आझम याने पाकिस्तानसाठी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. 103 वनडे डावात बाबरने 59 च्या सरासरीने 5370 धावा केल्या आहेत. पण भारताविरोधात त्याला अर्धशतकही ठोकता आलेले नाही. भारताच्या गोलंदाजीसमोर बाबर संघर्ष करताना पाहायला मिळतो. भारताविरोधात पाच एकदिवसीय सामन्यात बाबर आझम याला 31.60 च्या सरासरीने फक्त 158 धावा करता आल्यात. 

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वगळता आशिया चषक 2023 स्पर्धेतील कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यालाही राखीव दिवस नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आशिया चषक स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अंतिम सामना आणि सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही सामने जेव्हा सुरू होतील, त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सामना छोटा झाला, तरीही त्याच दिवशी संपवला जाईल. असे असूनही सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना रोखण्यात आला होता, तिथूनच सुरू केला जाईल. 

कुठे अन् कधी होणार सामना ?

आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होलटेज सामना 10 सप्टेंबर रोजी रविवारी खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, या महामुकाबल्याची सुरुवात दुपारी 3 वाजता होणार आहे.  तर दुपारी 2.30 वाजता नाणेफेक होणार आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या प्लेईंग 11 मध्ये कोण-कोण?

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फकर झमान, एमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्कीखर अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फाहिम अशरफ, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, हरीस रौफ.

कोलंबोतील हवमान स्वच्छ, पावसाची शक्यता मावळली

IND vs PAK Asia Cup 2023 LIVE: कुठे अन् कधी होणार सामना ?

आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होलटेज सामना 10 सप्टेंबर रोजी रविवारी खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, या महामुकाबल्याची सुरुवात दुपारी 3 वाजता होणार आहे.  तर दुपारी 2.30 वाजता नाणेफेक होणार आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

IND vs PAK Asia Cup 2023 LIVE : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा थरार होणार आहे. या लढतीला आता आवघे काही तास शिल्लक आहेत. साखळी फेरीत पावसाने खोडा घातला होता, त्यामुळे लढत रद्द करावी लागली होती. या हायहोल्टेज सामन्याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे. रविवारी या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी पिच रिपोर्ट, प्लेईंग ११ अन् इतर बाबी जाणून घेऊयात..


कशी आहे खेळपट्टी ? 


तीन दिवसांपासून कोलंबोमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खेळपट्टी आणि मैदानावर परिणाम झालेला असू शकतो. रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रेमदासा स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. मैदानाची आऊटफिल्डही वेगवान आहे. त्यामुळे पावसाने उसंत घेतली तर धावांचा पाऊस पडेल.


कुठे अन् कधी होणार सामना ?









पावसाची शक्यता - 


रविवारी कोलंबोध्ये दिवसभर पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवमान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी सकाळपासूनच पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दिवसभरात सरासरी 70 टक्केंपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.


भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वगळता आशिया चषक 2023 स्पर्धेतील कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यालाही राखीव दिवस नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आशिया चषक स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अंतिम सामना आणि सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही सामने जेव्हा सुरू होतील, त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सामना छोटा झाला, तरीही त्याच दिवशी संपवला जाईल. असे असूनही सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना रोखण्यात आला होता, तिथूनच सुरू केला जाईल. 


कुणाचे पारडे जड - 


भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटले की चाहत्याच्या नजरा सामन्याकडेच असतात. एक काळ असा होता की, भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी असा सामना असायचा... पण आता पाकिस्तानच्या तोडीस तोड भारताची गोलंदाजी आहे आणि भारताच्या फलंदाजीला आव्हान देणारी पाकिस्तानची फलंदाजी आहे. त्यामुळे सामना रंगतदार होईल.  जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज पाकिस्तानच्या गोलंदाजापेक्षा कमी नाहीत. पाकिस्तानची फलंदाजीही दमदार आहे.  बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा आणि इमाम उल हक शानदार फॉर्मात आहेत. इफ्तिखारही रंगात आहे. शनिवारी रोमांचक सामना होईल. दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत.  


पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग 11


इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी 


भारताची संभाव्य प्लेईंग 11 


शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.


हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?


आशिया कप सुपर 4 फेरीत टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याआधी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती.  


भारतात कधी पाहता येणार IND vs PAK हायव्होलटेज सामना?


टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. 


लाईव्ह स्ट्रीम फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?


टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.


आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.


राखीव खेळाडू : संजू सॅमसन


आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ 
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रौफ.


साखळी फेरीतील सामन्याचा लेखाजोखा 


शनिवारी, दोन सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. भारताची आघाडीची फळी 15 षटकांच्या आत तंबूत परतली होती. एकवेळ भारताची अवस्था 4 बाद 66 अशी दयनीय झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. भारतीय संघ 150 धावांपर्यंत पोहचणार का ? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जिगरबाज खेळी करत भारताचा डाव सावरला होता. हार्दिक पांड्याने 87 धावांची झुंजार खेळी केली होती. तर इशान किशन याने 82 धावांचे वादळी योगदान दिले होते. हार्दिक पांड्या आणि इशान किशन या जोडीने पाचव्या विकेटला 138 धावांची भागिदारी केली. हार्दिक आणि इशान या जोडीच्या बळावर भारतीय संघाने 266 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर पावसाने खोडा घातल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला भारतीय फलंदाज कसे तोंड देणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या वेगवान तिकडीने पहिल्या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ तंबूत धाडला होता. आता 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.