Economic Survey 2025, Budget 2025 नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2024-25 चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल मांडला जातो. आर्थिक पाहणी अहवाल दरवर्षी तयार करतात आणि तो बजेटच्या मांडणीपूर्वी सादर केला जातो. भारतीय अर्थव्यवस्थेने संबंधित आर्थिक वर्षात कशी कामगिरी केली आणि पुढच्या काळात भारताच्या काय योजना असतील, या संदर्भातील माहिती आर्थिक पाहणी अहवालात असते.
आर्थिक पाहणी अहवालात संबंधित आर्थिक वर्षातील कामगिरीचं सखोल विश्लेषण, भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी, प्रमुख आर्थिक निर्देशांक आणि भावी अंदाज असतात. अर्थसंकल्पाशी निगडित प्रमुख कागदपत्रांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते.
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं?
आर्थिक पाहणी अहवाल केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक कामकाजाची विभागाच्या अर्थविषयक विभागाकडून तयार केला जातो. भारत सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्याकडून याचं निरीक्षण केलं जातं.
आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्यामध्ये आर्थिक स्थितीचं परीक्षण करणे आणि विविध क्षेत्रांच्या प्रगतीचं मूल्यमापन करणे, आर्थिक निर्देशाकांचा विश्लेषण ज्यामध्ये रुपयाची घसरण, ग्राहकांच्या खरेदीचा पॅटर्न, विकास दर यासंदर्भातील माहिती असते. प्रमुख बदल सूचवलेले असतात. गरिबी दूर करणे, वातावरणीय बदलाचा परिणाम, शैक्षणिक सुधारणा, पायाभूत सुविधा, वित्त विभागाचा विकास यासंदर्भातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा त्यात समावेश असतो.
1950-51 मध्ये पहिल्यांदा आर्थिक पाहणी अहवाल अर्थसंकल्पाचा भाग म्हणून सादर करण्यात आला.1960 पासून तो अर्थसंकल्पापासून वेगळा सादर करण्यात आला. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाो.
आर्थिक पाहणी अहवालात विविध आर्थिक क्षेत्रातील कामगिरीचं सखोल परीक्षण केलेलं असतं. आर्थिक धोरणासंदर्भातील काही मुद्द्यांचा अभ्यास, याशिवाय अर्थमंत्र्यांकडून काही घोषणांची शक्यता आहे.
2024-25 चा आर्थिक पाहणी अहवाल कधी सादर होणार
भारताच्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (31 जानेवारी) सुरु होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीनिमित्त अभिभाषण करतील. त्यानंतर निर्मला सीतारामन दुपारी 12 ते 1 दरम्यान आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडतील. त्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनाथा नागेश्वरन माध्यमांना अडीच वाजता माहिती देतील.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारच्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प उद्या सादर होईल. यामध्ये सरकार कोणत्या घोषणा करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या :