IND vs NZ : आज अखेरचा टी-20 सामना, मालिका जिकल्यानं भारताला प्रयोगाची संधी!
IND vs NZ : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघानं न्यूझीलंडविरोधात दोन सामन्यात बाजी मारत दिमाखात सुरुवात केली.
IND vs NZ : युएईमध्ये झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पण रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघानं न्यूझीलंडविरोधात दोन सामन्यात बाजी मारत दिमाखात सुरुवात केली. तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत भारतीय संघानं वर्चस्व गाजवलं आहे. आज, रविवारी होणाऱ्या अखेरच्या टी-20 सामन्यात विजय मिळवत निर्वादित वर्चस्व राखण्याचं भारतीय संघाचं लक्ष असेल. आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाला प्रयोगाची संधी आहे. दुसरीकडे अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरेल.
पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मानं प्रयोग करणं टाळलं होतं. फलंदाजीमध्ये कोणताही बदल केला होता. पण आता मालिका जिंकल्यामुळे अखेरच्या समन्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुर्यकुमार यादवला आराम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज होणाऱ्या सामन्यात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुलला चार दिवसांच्या अंतरातच कसोटी मालिकेतसुद्धा खेळायचे असल्याने त्याला विश्रांती देऊन ऋतुराज सलामीला येऊ शकतो, तर ऋषभ पंतऐवजी किशनकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. प्रदीर्घ काळाने संघात परतलेला श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर यांना मात्र आणखी एक संधी मिळू शकते.
याशिवाय, हर्षल पटेल याचीही जागा पक्की मानली जातेय. तसेच आवेश खानलाही आज संधी मिळण्याची शक्यता आहे. आवेश खान न्यूझीलंडविरोधात भारतीय संघात पदार्पण करण्यास तयार आहे. भुवनेश्वर कुमारला आराम देऊन त्याजागी आवेश खानला संधी मिळू शकते. अक्षर पटेललाही आराम मिळण्याची शक्यता आहे. अक्षरच्या जागी यजुवेंद्र चहलला अंतिम 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. अक्षर पटेलला दोन सामन्यात संधी मिळाली मात्र, त्याला आपेक्षानुसार कामगिरी करता आलेली नाही.
प्रतिस्पर्धी संघ -
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, यजुर्वेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : टिम साऊदी (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरेल मिचेल, टॉड अॅस्टल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशाम, टिम सेईफर्ट, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, लॉकी फग्र्युसन, मिचेल सँटनर, इश सोधी, रचिन रवींद्र.