India Vs New Zealand 1st Test : बंगळुरूमध्ये पावसाचा कहर; टॉसला उशीर, किती वाजता होणार नाणेफेक?, जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
India vs New Zealand 2024 Bengaluru Weather : बांगलादेशविरुद्धकसोटी आणि टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप लक्षात घेता टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. भारताला आणखी आठ कसोटी खेळायच्या आहेत आणि त्यापैकी पाच जिंकायचे आहेत, तरच संघ WTC अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकेल.
पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बेंगळुरू कसोटीत नाणेफेक होण्यास विलंब होत आहे. पावसामुळे सध्या मैदान कव्हरने झाकले आहे. अजूनही पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत नाणेफेकबाबत अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. सामना सुरू होण्यासही विलंब होऊ शकतो. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका संपल्यानंतर भारताला नोव्हेंबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे, जिथे त्यांना पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिक खेळायची आहे.
बंगळुरूमध्ये आज मुसळधार पाऊस
दरम्यान, बंगळुरूमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिथे अजूनही पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस बंगळुरूमध्ये ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. त्यात कर्नाटक सरकारने बुधवारी शाळांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे, तर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. बेंगळुरूमध्ये गेल्या काही दिवसांपासून इतका पाऊस झाला आहे की, तिथल्या रस्त्यांवर पाणी साचले आहे. पुरासारखी परिस्थिती आहे.
अशा स्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या दिवसाच्या खेळावरही परिणाम होऊ शकतो. Accuweather च्या अहवालानुसार सकाळी 90 टक्के पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र, सकाळच्या वेळी पावसाची फारशी शक्यता नसून, दिवस सरत असताना मुसळधार पाऊस पडू शकतो. Accuweather च्या अहवालानुसार, बुधवारी दुपारी बेंगळुरूच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश ढगांनी झाकलेले असेल. पावसाची शक्यता 41 टक्के आहे.
TOSS DELAYED DUE TO RAIN AT BENGALURU FOR THE FIRST TEST 🏏 pic.twitter.com/cL2LM1Yqny
— Johns. (@CricCrazyJohns) October 16, 2024
दोन्ही संघाची प्लेईंग 11 अशी असू शकते...
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड संघ : टॉम लॅथम (कर्णधार), ड्वेन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, विल ओ'रुर्के, एजाज पटेल.