IND vs ENG Test Series 2025 : Star Sportsवर नाही, आता इथं पाहा भारत-इंग्लंड कसोटी! अचानक बदलला लाईव्ह टीव्हीचा चॅनल, जाणून घ्या A टू Z
कसोटी क्रिकेटमधून विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विन यांसारख्या दिग्गजांनी निवृत्ती घेतल्यानंतर, आता नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळाली आहे.

IND vs ENG Test Series 2025 : भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरूवात होणार आहे. कसोटी क्रिकेटमधून विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विन यांसारख्या दिग्गजांनी निवृत्ती घेतल्यानंतर, आता नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज झाली असून, यावेळी संघाचे नेतृत्व युवा फलंदाज शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. शुभमन गिल आता अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंचा ताफा घेऊन थेट इंग्लंडच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेला सामोरा जाणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही पाच सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवार 20 जूनपासून सुरू होत असून, क्रिकेटप्रेमींसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा असणार आहे. गिलच्या नेतृत्वाखालील नव्या टीमकडून चाहते मोठ्या कामगिरीची अपेक्षा करत आहेत. दरम्यान, यावेळी कसोटी सामन्यांचे थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंगचे चॅनल पूर्णपणे बदलण्यात आले आहे. यावेळी चाहते ही मालिका स्टार स्पोर्ट्सवर थेट पाहू शकणार नाहीत.
आता मालिका स्टार स्पोर्ट्सवर नाही तर 'या' चॅनलवर पहा
आयपीएल 2025 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओहॉटस्टारवर केले जात होते, परंतु आता भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी हे चॅनल बदलले आहे. आता ही कसोटी मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तर फोनवर या मालिकेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण चाहत्यांसाठी पूर्वीप्रमाणेच जिओ हॉटस्टार अॅपवर केले जाईल.
शुभमन गिलसाठी हा दौरा खूप खास असणार आहे, कारण तो पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर कसोटी मालिका नेहमीच खास मानली जाते आणि चाहत्यांना गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा असतात. अशा परिस्थितीत, तरुण कर्णधार रणनीती कशी बनवतो आणि त्यांच्याच भूमीवर इंग्लिश संघाला आव्हान कसे देतो हे पाहणे मनोरंजक असेल.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-
पहिली कसोटी- 20-24 जून, 2025 - हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी- 2-6 जुलै, 2025 - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी- 10-14 जुलै, 2025 - लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी- 23-27 जुलै, 2025 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी- 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 - द ओव्हल, लंडन
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल.
हे ही वाचा -





















