एक्स्प्लोर

India vs England : यशस्वी जैस्वालची शतकाकडे वाटचाल; पहिल्या दिवसानंतर भारताची सरशी, धावसंख्या 1 बाद 119

India vs England first test Hyderabad : प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला सर्वबाद 246 पर्यंत मजल मारता आली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दिवस संपेपर्यत 1 बाद 119 धावांपर्यंत मजल मारली आहे.

India vs England first test Hyderabad हैदराबाद : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील पहिल्या दिवस भारताच्या नावे राहिला. नाणेफेक जिंकलेल्या इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला सर्वबाद 246 पर्यंत मजल मारता आली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दिवस संपेपर्यत 1 बाद 119 धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडकडे अजूनही 127 धावांची आघाडी आहे. मात्र, भारताने आक्रमक गोलंदाजी आणि फलंदाजी करत आजचा दिवस आपल्या नावावर केला आहे. भारताकडून रोहित शर्मा 27 चेंडूमध्ये 24 धावा करत बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल 70 चेंडूमध्ये 76 आणि शुभमन गिल 43 चेंडूमध्ये 14 धावा करत क्रिजवर टिकून आहे. 

भारताने पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडचा (India vs England) पहिला डाव पहिल्याच दिवशी 246 धावांवर गुंडाळला. या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी  इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: घेरुन ठेवलं. भारताकडून रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि आर अश्विनने (R Ashwin) प्रत्येकी 3 तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. 

यानंतर भारताकडून सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal)  मैदानात उतरले. या दोघांनी आपल्या स्टाईलमध्ये धुलाईला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये 65 धावांचा टप्पा पार केला. एकीकडे यशस्वी जयस्वालने अर्धशतक पूर्ण केलं, तर दुसरीकडे रोहित शर्मा त्याला साथ देत सावध खेळत होता. मात्र एक फटका खेळण्याच्या नादात लीचच्या गोलंदाजीवर रोहित 24 धावा करुन माघारी परतला. रोहित बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या 80 होती.

भारतीय फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी (England Cricket inning)

त्याआधी भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज गोलंदाजी केली. इंग्लंडकडून झॅक क्रॉली (Zak Crawley ) आणि बेन डकेत (Ben Duckett)  यांनी सावध सुरुवात केली. मात्र आर अश्विनने डकेतला पायचित करुन भारताला 55 धावांवर पहिलं यश मिळवून दिलं. डकेतने 39 चेंडूत 35 धावा केल्या.त्यानंतर मग लगेचच रवींद्र जाडेजाने ओली पोपला 1 धावेवर बाद केलं. मग अश्विननेच दुसरा सलामीवीर क्रॉलीचा काटा काढला. क्रॉलीला सिराजकरवी झेलबाद केलं. त्याने 20 धावा केल्या. 
क्रॉली बाद झाला त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या 3 बाद 60 अशी होती. 

यानंतर मग ज्यो रुट आणि जॉनी बेअस्ट्रो यांनी डाव सांभाळला. दोघांनी संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला. एकीकडे ही जोडी जमत आहे असं वाटत असतानाच, अक्षर पटेलने बेअस्ट्रोचा अडथळा दूर केला. 

बेन स्टोक्सच्या सर्वाधिक धावा (Ben Stokes 70 runs)

भारताच्या फिरकी तिकडीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले असताना, इंग्लंडच्या आजी-माजी कर्णधारांनी काहीसा डाव सावरला. जो रुटने 60 चेंडूत 29 धावा केल्या. तर कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा काढल्या. जाडेजाने रुटला माघारी धाडत, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. मग ठराविक अंतराने जाडेजा, अश्विन, अक्षर पटेल आणि बुमराह विकेट घेत राहिले. पण एका बाजूने बेन स्टोक्स लढत राहिला. अखेर 64.3 षटकात बुमराहने बेन स्टोक्सची दांडी उडवून इंग्लंडची शेवटची विकेट मिळवली. स्टोक्सची रुपाने इंग्लंडला दहावा धक्का बसला!

India's Playing XI in 1st Test - पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर.अश्विन, जसप्रीत बुमराह(उप कर्णधार), मोहम्मद सिराजRohit Sharma, Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Shreyas Iyer, KL Rahul, KS Bharat, Ravindra Jadeja, Axar Patel/Kuldeep Yadav, Ravichandran Ashwin, Jasprit Bumrah, Mohammed Siraj

England Playing XI for 1st Test  पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 -

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, जॅक क्रॉली, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, जो रूट आणि मार्क वूड.  Zak Crawley, Ben Duckett, Ollie Pope, Joe Root, Jonny Bairstow, Ben Stokes (C), Ben Foakes, Rehan Ahmed, Tom Hartley, Mark Wood, Jack Leach

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -  

पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम) 

संबंधित बातम्या

इंग्लंडची प्रथम फलंदाजी, भारताच्या ताफ्यात 3 फिरकी गोलंदाज, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget