IND vs ENG 2nd Test: भारताने पहिला डाव 364 धावांवर आटोपला, जेम्स अँडरसनते पाच बळी
England vs India 2nd Test: लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या डावात 364 धावा केल्या.

IND vs ENG 2nd Test Live Score: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात 364 धावांवर सर्वबाद झाला. भारतासाठी सलामीवीर केएल राहुलने 250 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 129 धावा केल्या. दुसरीकडे इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 62 धावा देऊन पाच बळी घेतले.
आज सकाळी भारताने राहुल 127 आणि अजिंक्य रहाणेने तीन धावांवर 276 धावांपासून सुरुवात केली आणि डाव एका धावेने पुढे नेला. मात्र, राहुल फार काळ टिकू शकला नाही आणि कालच्या स्कोअरमध्ये फक्त दोन धावा जोडल्यानंतर तो बाद झाला. यानंतर रहाणेनेही आपली विकेट गमावली. त्याने 23 चेंडूत एक धाव केली.
Innings Break!
— BCCI (@BCCI) August 13, 2021
Jadeja (40) is the last one to depart as #TeamIndia are all out for 364 runs.
Scorecard - https://t.co/KGM2YEualG #ENGvIND pic.twitter.com/hOWcJNlGKu
मात्र, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी पुन्हा भारतीय डाव सांभाळला आणि दोन्ही फलंदाजांमध्ये सहाव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी झाली. पण पंत बुडचा बळी ठरला. त्याने 58 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. पंतच्या बाद झाल्यानंतर लगेचच, नवीन फलंदाज म्हणून उतरलेला मोहम्मद शमी खाते न उघडता सातवा फलंदाज म्हणून बाद झाला.
लंच ब्रेकनंतर भारतीय डाव कोसळला आणि अँडरसनने इशांत शर्मा (8) आणि जसप्रीत बुमराह (0) च्या विकेट घेतल्या तर वुडने रवींद्र जडेजाला बाद करत भारतीय डाव गुंडाळला. जडेजाने 120 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. दुसरीकडे इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने पाच बळी घेतले. याशिवाय ऑली रॉबिन्सन आणि मार्क वुडने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर मोईन अलीला एक विकेट मिळाली.
पहिला सामना अनिर्णित
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू झाला. गेल्या आठवड्यात दोन्ही संघांमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या कसोटीपूर्वी दोन्ही संघ आपापल्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे अडचणीत असल्याचे दिसत आहे.
टीम इंडिया पहिल्या टेस्टमध्ये खूप मजबूत स्थितीत होती. पहिल्या डावातील अव्वल फलंदाजांची निराशाजनक कामगिरी असूनही भारताने 277 धावांची मोठी धावसंख्या उभारली. एवढेच नाही तर गोलंदाजीत भारताचा समतोलही अगदी योग्य दिसत होता. पण शार्दुल ठाकूरच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा त्रास वाढला आहे. दुसऱ्या कसोटीत भारताला इच्छा नसतानाही प्लेइंग 11 बदलावे लागेल.




















