एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IND vs ENG : विकेटकिपर कोण, विराटची जागा कोण घेणार? पाहा भारताची संभाव्य प्लेईंग 11

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकिपर कोण असेल? याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे. विराट कोहलीची जागा कोण घेणार? नवख्या रजत पाटीदारला संधी मिळणार का? भारताची गोलंदाजी कशी असेल? यासारख्या प्रश्नाची उत्तरे नाणेफेकीनंतरच मिळणार आहेत. पाहूयात भारताची संभाव्य प्लेईंग 11

IND vs ENG 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला (IND vs ENG Test) सुरुवात होणार आहे.  हैदराबाद  (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) येथे पहिला कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकिपर कोण असेल? याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे. विराट कोहलीची जागा कोण घेणार? नवख्या रजत पाटीदारला संधी मिळणार का? भारताची गोलंदाजी कशी असेल? यासारख्या प्रश्नाची उत्तरे नाणेफेकीनंतरच मिळणार आहेत. पाहूयात भारताची संभाव्य प्लेईंग 11

Who Replaces Virat Kohli? विराटची जागा कोण घेणार ? - 

अनुभवी फलंदाज विराट कोहली याने माघार घेतल्यानंतर भारताच्या फलंदाजीची सगळी भिस्त रोहित शर्मा याच्यावरच असेल. रोहित शर्मा यशस्वी जायस्वालच्या साथीने डावाची सुरुवात करेल. शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. विराट कोहलीच्या जागी कुणाला संधी मिळणार, याचीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. केएल राहुल याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. विराटच्या अनुपस्थितीत केएल राहुल याचा अनुभवाचा फायदा भारत उचलेल. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. नवख्या केएस भरत याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. 

Who will be India's wicket-keeper batter vs England? विकेटकिपर कोण ? 

केएल राहुल विकेटकिपिंग करणार नसल्याचे भारताचा कोच राहुल द्रविड (Rahul dravid) यांनी मंगळवारी स्पष्ट केले. त्यानंतर केएस भरत (KS Bharat) आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. या दोघांपैकी एका जणाला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. केएस भरत याचा दावा अधिक मजबूत वाटतोय. भरत याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्या तुलनेत ध्रुव जुरेल नवखा आहे. त्यामुळे केएस भरत याला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. 

What Should be the Bowling Combination? गोलंदाजी कशी असेल ?

भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरले. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे दोन वेगवान गोलंदाज असतील. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांचं स्थान निश्चित आहे. तिसऱ्या फिरकी गोलंदाजासाठी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यामध्ये स्पर्धा असेल. कुलदीप यादव याच्याकडे विविधता आहे. तर अक्षर पटेल फलंदाजी करु शकतो. त्यामुळे या दोन फिरकी गोलंदाजापैकी कुणाला संधी मिळणार, हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.  


India's Predicted Playing XI in 1st Test - पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल/कुलदीप यादव, आर.अश्विन, जसप्रीत बुमराह(उप कर्णधार), मोहम्मद सिराज

Rohit Sharma, Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Shreyas Iyer, KL Rahul, KS Bharat, Ravindra Jadeja, Axar Patel/Kuldeep Yadav, Ravichandran Ashwin, Jasprit Bumrah, Mohammed Siraj

England Playing XI for 1st Test  पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 -

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, जॅक क्रॉली, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, जो रूट आणि मार्क वूड.
 
Zak Crawley, Ben Duckett, Ollie Pope, Joe Root, Jonny Bairstow, Ben Stokes (C), Ben Foakes, Rehan Ahmed, Tom Hartley, Mark Wood, Jack Leach

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -  
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)

आणखी वाचा :

साहेबांना फिरकी रोखणार का? भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून कसोटीचा थरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Embed widget