India vs Bangladesh T20: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत टीम इंडियाचा 2-0 अशा फरकाने विजय मिळवला. पहिली कसोटी चेन्नईत आणि दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळली गेली. चेन्नई कसोटीत टीम इंडियाने 280 धावांनी विजय मिळवला, तर कानपूर कसोटीत भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. आता कसोटीनंतर दोन्ही संघ टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरणार आहेत.
भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. 6 ऑक्टोबरपासून ही टी-20 मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.यानंतर, मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार तिन्ही टी-20 सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील.
सामना कुठे बघाल?
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेचे स्पोर्ट्स 18 च्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाईल. मोबाईलवर या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर 'फ्री' असेल.
भारत विरुद्ध बांगलादेश टी-20 मध्ये हेड टू हेड-
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने 14 पैकी 13 सामने जिंकले आहेत, तर एक सामना बांगलादेशने जिंकला आहे.
टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
पहिला सामना - 6 ऑक्टोबर 2024 - भारत विरुद्ध बांगलादेश - न्यू माधवराव सिंधिया स्टेडियम, ग्वाल्हेर
दुसरा सामना - 9 ऑक्टोबर 2024 - भारत विरुद्ध बांगलादेश - अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
तिसरा सामना- 12 ऑक्टोबर 2024- भारत विरुद्ध बांगलादेश- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.
टी-20 मालिकेसाठी बांगलादेश संघ-
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदॉय, महमुदुल्ला, लिटन दास, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, तन्झीम हसन साकीब, तनजीद हसन साकीब हसन.