Ind vs Ban: कानपूर टेस्ट 5 कारणांमुळे क्रिकेटच्या इतिहासात अजराअमर ठरणार; प्रेक्षक हे क्षण विसरुच शकणार नाहीत!
बांगलादेशविरुद्ध कानपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेतील टीम इंडियाने दुसरा सामनाही जिंकला आहे. रोहित शर्मा ब्रिगेडने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेन्नई येथे झालेल्या सामन्यात भारताने 280 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळली गेलेली ही कसोटी अनेक विक्रमांमुळे कायम लक्षात राहील.
1. विजय मिळवण्याची जिद्द- पावसामुळे पूर्ण दोन दिवस वाया गेल्यानंतर कोणत्याही संघाने हार मानली असती. पण भारताने हे केले नाही. चौथ्या दिवशी सामना सुरू झाल्यापासूनच भारताला काहीही करुन विजय मिळवायला आहे, हे स्पष्ट दिसत होतं.
2. भारतीय खेळाडूंची फलंदाजी- भारताच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी संघ काय विचार करत आहे आणि काय करणार आहे हे दाखवून दिले. विकेट्स पडत राहिल्या पण भारताने आक्रमक फलंदाजी करणं सोडलं नाही.
3. रोहित शर्माने तयार केला टेम्पलेट- या सामन्यात रोहित शर्माने मोठी खेळी खेळली नसली तरी, त्याने आपल्या सहकाऱ्यांना दाखवून दिले की आक्रमक खेळायचे आहे. यानंतर कर्णधारपद आणि क्षेत्ररक्षणातही रोहितच्या निर्णयांसमोर बांगलादेशने गुडघे टेकले.
4. जलद फलंदाजीमध्ये विक्रम- भारताने पहिल्या डावात कसोटीत सर्वात जलद 50, 100, 150, 200 आणि 250 धावा करण्याचा विक्रम केला. यासोबतच पहिला डाव 35 षटकांत घोषित करून विक्रमही केला.
5. दोन दिवस खेळ न होऊनही विजय- कसोटी सामन्याचे पूर्ण दोन दिवस वाया गेले. कसोटी सामन्यातील 5 मधून 2 दिवस एकही षटक न टाकता रद्द झाल्याने सामना अनिर्णित राहिल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. त्यामुळेच हा सामना कायम लक्षात राहील.