India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 10 विकेट्स गमावत 376 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाल्यावर भारतीय संघाने झटपट चार विकेट्स गमावल्या. त्यामुळे 400 धावांचा टप्पा ओलांडण्याचे गणित भारताचे बिघडले.


तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत बांगलादेशने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवसअखेर 6 विकेट्स गमावत 339 धावा केल्या होत्या. आज पुन्हा फलंदाजीसाठी येताच टीम इंडियाला सातवा धक्का बसला. रवींद्र जडेजा 86 धावा करून बाद झाला. वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने त्याला झेलबाद केले. 343 धावांवर भारताने 7वी विकेट गमावली. त्यानंतर आकश दीपने अश्विनसोबत छोटी पण महत्वाची खेळी केली. त्याने 30 चेंडूत 17 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराहने 7 धावा केल्या. अश्वीन 113 धावांवर झेलबाद झाला. 






बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला जास्त धावा करता आल्या नाही. दोन्ही खेळाडू 6-6 धावा करून बाद झाले. तर शुभमन गिल शून्यावर बाद झाला. यशस्वी जैस्वालने 56 धावा, ऋषभ पंतने 39, केएल राहुलने 16, रवींद्र जडेजाने 86 धावा केल्या. 


हसन महमूदच्या पाच विकेट्स-


बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने पाच विकेट्स घेतल्या. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराहला हसन महमूदने बाद केले. तर तस्किन अहमदने 3 विकेट्स घेतल्या. नहीद राणा, मेहंदी हसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 


कोण आहे हसन महमूद? (Who Is Hasan Mahmud)


हसन महमूद हा वेगवान गोलंदाज आहे जो बांगलादेशसाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. 2020 मध्ये हसन महमूदने बांगलादेशकडून टी-20 द्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये हसन महमूदला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2024 मध्ये त्याचे नशीब उघडले आणि त्याला कसोटी क्रिकेटमध्ये देखील पदार्पण करण्याची संधी मिळाली. महमूदने एप्रिल 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. यानंतर हसन महमूदला पाकिस्तान दौऱ्याची संधी मिळाली. आता तो भारताविरुद्ध कारकिर्दीतील चौथी कसोटी खेळत आहे. 


संबंधित बातमी:


Ind vs Ban: टीम इंडियाला चुणूक लागलेली, विशेष सरावही केला; पण तो आला अन् कहर माजवला, कोण आहे हसन महमूद?