Sanju Samson: भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban Score) यांच्यातील पहिली कसोटी चेन्नईत खेळली जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर भारताने 6 विकेट्स गमावत 339 धावा केल्या. भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. 


भारताने 34 धावांवर 3 आणि 144 धावांवर 6 विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरला. अश्विन आणि जडेजाने 227 चेंडूत 195 धावांचा भागिदारी करत संघाची धावसंख्या 339 वर पोहचवली. भारत आणि बांगलादेशच्या कसोटी मालिकेकडे सर्वांचं लक्ष असताना भारतीय संघाचा फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) दुलीप ट्रॉफी स्पर्धेत कहर केला आहे. 


दुलीप ट्रॉफीमध्ये संजू सॅमसनने (Sanju Samson) शानदार फलंदाजी केली. दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया डी संघाकडून खेळताना संजू सॅमसनने अवघ्या 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा संजू सॅमसन 89 धावा करून नाबाद परतला. आतापर्यंत संजू सॅमसनने आपल्या डावात 83 चेंडूंचा सामना केला असून 89 धावा केल्या आहेत. संजू सॅमसनने 100 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या. संजू सॅमसनने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी संजू सॅमसनच्या शानदार फलंदाजीमुळे दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत-डीची धावसंख्या 5 विकेटवर 306 धावा आहे. संजू सॅमसनसोबत सरांश जैन 26 धावा करून खेळत आहे.


इंडिया-डीच्या टॉप-3 फलंदाजांचे अर्धशतक-


याआधी इंडिया-डीच्या टॉप-3 फलंदाजांनी पन्नास धावांचा टप्पा ओलांडला होता. सलामीवीर फलंदाज देवदत्त पदीकलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत 95 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. याशिवाय श्रीकर भरतने 105 चेंडूत 52 धावांची दमदार खेळी केली तर रिकी भुईने 87 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. यानंतर संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करत 89 धाना करुन नाबाद राहिला.


सामना कुठे पाहता येणार?


स्पोर्ट्स 18 च्या माध्यमातून दुलिप ट्रॉफीचे सामने टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जातील. याशिवाय स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर केले जाईल. चाहत्यांना JioCinema वर विनामूल्य सामन्यांचा आनंद घेता येईल.


भारत विरुद्ध बांगलादेशच्या पहिल्या कसोटी सामन्याची काय स्थिती?


भारताची 6 बाद 144 धावा अशी बिकट अवस्था झाली असताना रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या गड्यासाठी नाबाद 195 धावांची जबरदस्त भागीदारी केली. या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर शानदार पुनरागमन करताना 80 षटकांत 6 बाद 339 धावा काढत दमदार वाटचाल केली. अश्विनने 112 चेंडूंत 10 चौकार व 2 षट्‌कारांसह नाबाद 102, जडेजाने 117 चेंडूंत 10 चौकार व 2 षट्‌कारांसह नाबाद 86 धावा केल्या आहेत.


संबंधित बातमी:


Ind vs Ban: टीम इंडियाला चुणूक लागलेली, विशेष सरावही केला; पण तो आला अन् कहर माजवला, कोण आहे हसन महमूद?