IND vs BAN 1st Test Live : पंतला महागात पडली ही चूक, खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर गमावली विकेट
Rishabh Pant vs Bangladesh 1st Test Live : ऋषभ पंतने तब्बल २ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण...
India vs Bangladesh 1st Test Live : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. पहिल्या दिवशी पंत चांगलाच फॉर्मात दिसत होता. पंतच्या बॅटमधून अनेक शानदार शॉट दिसले, त्यानंतर चाहत्यांना वाटले की पंत आज मोठी खेळी खेळणार आहे, पण तसे होऊ शकले नाही. खराब शॉट खेळून पंत आऊट झाला.
पंतला ही चूक पडली महागात
खरंतर, ऋषभ पंत जेव्हा 39 धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा त्याने महमूद हसनच्या ऑफ साइडला जाणाऱ्या चेंडूवर शॉट खेळला. त्यामुळे चेंडू पंतच्या बॅटची अगदी किंचित धार घेऊन यष्टीरक्षक लिटन दासच्या हातात गेला. अशा प्रकारे पंतचा डाव संपुष्टात आला. पंतने 39 धावांच्या खेळीत 6 चौकार मारले होते. महमूद हसनची या सामन्यातील ही चौथी विकेट होती.
पहिल्या दिवशी 3 मोठे फलंदाज ठरले फ्लॉप
पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल कसोटी सामन्यात भारतीय डावाची सुरुवात करताना दिसले. मात्र रोहित जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. पहिल्या दिवशी रोहित 6 धावा करून बाद झाला, महमूद हसनने भारतीय कर्णधाराला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर आलेला शुभमन गिलही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही.
Rishabh Pant goes for 39 !!
— Cricket Chamber (@cricketchamber) September 19, 2024
Was batting so well but played a lazy shot chasing one outside off !! pic.twitter.com/kAZmfqPVCf
गिलने 8 चेंडूंचा सामना केला आणि खाते न उघडता बाद झाला. विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, पण कोहलीनेही पहिल्या दिवशी नाराज केले. विराट पहिल्या डावात 6 धावा करून आऊट झाला. या सर्व फलंदाजांना बांगलादेशचा वेगवान गोलंदाज महमूद हसनने आऊट केले.
हे ही वाचा -