Ind vs Aus Test Series : आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन कोण? सलामीचे दोन्ही पर्याय फ्लॉप
टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची असेल तर ही मालिका 4-0 अशी जिंकावी लागेल. मात्र, टीम इंडियाच्या अडचणी कमी होत नाहीत.
India vs Australia Test Series 2024-25 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित मालिका आता जवळ येत आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. कारण टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची असेल तर ही मालिका 4-0 अशी जिंकावी लागेल. मात्र, टीम इंडियाच्या अडचणी कमी होत नाहीत. मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाला दोन मोठे टेन्शन आहेत जे दूर करावे लागतील.
बॉर्डर गावसकर मालिकेतील पहिल्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा गैरहजर राहणार आहे, रोहितने बीसीसीआयला याबाबत आधीच कळवले आहे. सध्या फक्त पहिल्या सामन्याचीच चर्चा होत आहे, मात्र तो दुसऱ्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे. आता सर्वात मोठे टेन्शन आहे की रोहित नसेल तर टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी निवडलेल्या संघात जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अशा स्थितीत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत त्याने केवळ एका कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले आहे, ज्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे सलामीच्या फलंदाजाची भूमिका कोण साकारणार असा प्रश्नही निर्माण झाला आहे. यशस्वी जैस्वाल ही सलामीवीर आहे, पण त्याचा जोडीदार म्हणून कोणाला स्थान दिले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केएल राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन हे दावेदार असले तरी सध्या ते दोघेही फ्लॉप आहे. भारताचा अ संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तेथे अनधिकृत सामने खेळल्या जात आहेत. केएल राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी सराव सामन्याच्या दोन्ही डावांची सलामी दिली, यावरून हे दोघेही संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती असल्याचे संकेत तर आहेत, पण आता जर दोघेही अपयशी ठरले आहेत, त्यामुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे.
भारताला पाच कसोटी सामन्यांची मालिका कोणत्याही किंमतीत जिंकावीच लागेल. न्यूझीलंडकडून लागोपाठ तीन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. आता आणखी एक पराभव झाल्यास संकट आणखी वाढले. समीकरणांबद्दल बोलायचे झाले तर, पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला किमान चार सामने जिंकावे लागतील, त्यानंतरच अंतिम फेरी निश्चित होईल. तीन सामने जिंकले आणि दोन हरले तर इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. त्याचबरोबर दोनच सामने जिंकले आणि तीन हरले, तर फायनल खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहू शकते.
हे ही वाचा -