Ind vs Aus 4th Test Live Streaming : इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्याची वेळ पुन्हा बदलली, भारत साखरझोपेत असताना रंगणार थरार; कधी, किती वाजता सामना होणार सुरू?
India vs Australia Live Stream How to Watch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. हा सामना 26 डिसेंबरला सुरू होणार आहे.
India vs Australia Melbourne test Live streaming : टीम इंडिया सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीवर आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला, पण ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाने पलटवार करत भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला. त्याचवेळी ब्रिस्बेन कसोटी पावसामुळे वाया गेला आणि त्यामुळे दोन्ही संघांना बरोबरीवर समाधान मानावे लागले.
आता या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न येथे गुरुवार 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी म्हणून होणार आहे. यासाठी भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, पण टीव्ही किंवा लाईव्ह स्ट्रीमवर मॅचचा आनंद घेण्यासाठी त्यांना झोपेमोड करावी लागणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चौथ्या कसोटीची वेळ, जी इतर तीन कसोटींपेक्षा वेगळी आहे.
मेलबर्न कसोटी किती वाजता होणार सुरू?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या तीनही सामन्यांच्या सुरुवातीची वेळ आतापर्यंत वेगळी होती. पर्थमधील पहिली कसोटी भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू झाली. तर ॲडलेडमध्ये भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता डे नाईट टेस्ट सुरू झाली. ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी पहाटे 5.50 वाजता सुरू झाली होती. पण या सगळ्यांच्या तुलनेत मेलबर्नमध्ये खेळवली जाणारी बॉक्सिंग डे कसोटी आणखी लवकर सुरू होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक पहाटे 4:30 वाजता होईल. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेण्यासाठी लवकर उठावे लागणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीच्या सत्राची वेळ
- पहिले सत्र : सकाळी 5:00 ते सकाळी 7:00 पर्यंत (भारतीय वेळेनुसार)
- दुसरे सत्र सकाळी 7:40 ते 9:40 (भारतीय वेळेनुसार)
- तिसरे सत्र 10:00 ते दुपारी 12:00 पर्यंत (भारतीय वेळेनुसार)
पण, जर काही कारणास्तव दिवसाची संपूर्ण षटके पूर्ण होण्यास उशीर झाला, तर खेळ अर्धा तास वाढवला जाऊ शकतो. अशा स्थितीत तिसरे सत्र दुपारी 12 ऐवजी साडेबारा वाजता संपणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी तुम्ही थेट कुठे पाहू शकता?
'बॉक्सिंग डे टेस्ट'चे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण होणार आहे. हे डिस्ने प्लस हॉटस्टार वेबसाइट आणि मोबाइल ऍप्लिकेशनवर थेट प्रक्षेपित केले जाईल. या सामन्याचे दूरदर्शन स्पोर्ट्सवरही थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याशिवाय तुम्ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी सामन्यातील A टू Z अपडेट तुम्ही एबीपी माझा या वेबसाइट पाहू शकता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी विनामूल्य कशी पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्सच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर चाहत्यांना हा सामना विनामूल्य पाहता येणार नाही. डीडी फ्री डिश असलेले चाहते डीडी स्पोर्ट्सवर हा सामना विनामूल्य पाहू शकतात.