एक्स्प्लोर

India vs Australia 3rd ODI Preview: एकदिवसीय सामन्यातील सलग सहावा पराभव टाळायचा असेल तर विराट कोहलीला करावं लागेल 'हे' काम

IND vs AUS: भारतीय कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या पराभवाची मालिका खंडीत करण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी झालेल्या मालिकेत न्यूझीलंडने भारताला 3-0 असं हरवलं होतं.

India vs Australia: पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला भारतीय संघ उद्या (2 डिसेंबर) रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात 66 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात 51 धावांनी पराभव केला आहे.

हे वर्ष विराट कोहलीच्या भारतीय संघासाठी चांगल ठरलं नाही. या वर्षीच्या सुरुवातीला न्युझीलंडविरोधात खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताला 3-0 असा पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ऑस्ट्रेलियाविरोधात सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

गोलंदाजांनी केली निराशा टीम इंडिया या दौऱ्यावर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव या सारख्या प्रमुख गोलंदाजांच्या फौजेसह गेली आहे. परंतु भारतीय संघाला भुवनेश्वर कुमारची उणीव जाणवतेय. पॉपर प्लेमध्ये विकेट पटकवण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्याचं चित्र आहे. गेल्या 14 एकदिवसीय सामन्यात केवळ पाच सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये विकेट घेण्यात यशस्वी ठरले आहेत. तिसऱ्या गोलंदाजाच्या स्वरुपात संघात सामील झालेल्या नवदीप सैनी पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यासाठी युवा खेळाडू टी. नटराजनला संधी द्यायला हवी. टी. नटराजन आयपीएलच्या 16 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत आणि त्याने सर्वात जास्त यॉर्करचा मारा केला आहे. त्याला आज संधी मिळाली तर डेथ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर अंकुश बसू शकतो.

रोहित शर्माची उणीव भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या सामन्यात 308 तर दुसऱ्या सामन्यात 338 धावा केल्या. भारतीय संघ दोन्ही सामन्यात विजय प्राप्त करु शकला नाही. त्यामुळे संघाला रोहित शर्माची उणीव भासत असल्याचं चित्र पहायला मिळतंय. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ओपनिंगला आलेल्या मयंक अग्रवाल याने अनुक्रमे 22 आणि 28 धावा केल्या परंतु धवन सोबत त्याला चांगली सलामी देण्यात अपयश आलं.

चहलच्या जागी कुलदीपला स्थान देण्याची गरज लेग स्पिनर युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलियाविरोधात दोन्ही सामन्यात अपयशी ठरला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 89 धावा दिलेल्या चहलने दुसऱ्या सामन्यात 71 धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चहलच्या गोलंदाजीचा सामना करण्यात कोणतीही अडचण येत नाही. या परिस्थितीत विराट कोहलीनं चाइनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला संधी देणं आवश्यक आहे. 60 सामन्यात 104 विकेट घेणाऱ्या कुलदीपने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 22 विकेट घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget