ऑस्ट्रेलिया पराभवाचा वचपा काढणार की भारत मालिका जिंकणार? दुसऱ्या सामन्याबाबत सर्व माहिती एका क्लिकवर
IND vs AUS, 2nd ODI : विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका सुरु आहे.
IND vs AUS, 2nd ODI : विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका सुरु आहे. पहिला वनडे सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानात झाला. या सामन्यात भारताने बाजी मारली होती. आता दुसरा सामना इंदौर येथील होळकर स्टेडिअमवर रंगणार आहे. कधी कुठे पाहता येणार, हा सामना.. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेबाबत सर्व माहिती एका क्लिकवर...
सामन्याची वेळ काय ?
मोहाली वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत १-० च्या फरकाने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना इंदौर येथील होळकर स्टेडिअवर होणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे कांगरु पलटवार करण्यास तयार आहेत. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामना होईल. हा सामना दुपारी 1.30 पासून खेळले जातील. एक वाजता नाणेफेक होईल. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका खूप महत्त्वाची मानली जाते.
कुठे पाहाल सामना ?-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमा अॅपवर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports 18 आणि डीडी स्पोर्ट्स या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.
खेळपट्टी कशी ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी इंदौरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाला मदत मिळू शकते. रविवारी होणाऱ्या सामन्यात सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाज फलंदाजाना अडचणीत टाकू शकतात.
दुसऱ्या वनडेत मुसळधार पावसाचा अंदाज -
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ सप्टेंबर रोजी इंदौरध्ये ढगाळ वातावरण असेल. सायंकाळनंतरही इंदौरमध्ये पावसाची शक्यता आहे. इंदौरमध्येही सकाळी वादळ येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मेघगर्जनेची शक्यता असून पाऊसही पडू शकतो. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, जे दिवस पुढे जात असताना हळूहळू ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
भारताची संभाव्य प्लेईंग -
शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर / कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग 11-
डेविड वार्नर, मिशेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कैमरून ग्रीन, जोश इंगलिस (विकेटकीपर), मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट आणि एडम जम्पा
भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्याचा लेखाजोखा -
मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. या विजयासह भारताने वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावलेय. भारतीय संघ तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड, काय स्थिती -
वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 147 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 55 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर 68 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 31 वेळा पराभव केला आहे.