(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS 2nd ODI: विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे; कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग 11?
India vs Australia: विशाखापट्टणममध्ये खेळवली जाणार ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे.
India vs Australia, 2nd ODI Playing 11: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियानं कांगारूंचा 5 गडी राखून पराभव केला. आता दोन्ही संघांच्या वनडे सीरीजमधील दुसरी वनडे 19 मार्च रोजी विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या वनडेतून पुनरागमन करणार आहे.
या कॉम्बिनेशनसोबत टीम इंडिया मैदानात उतरणार?
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर रोहित आणि गिल सलामीची धुरा सांभाळू शकतात. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल मधल्या फळीचा भाग असू शकतात. कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय रवींद्र जाडेजा आणि इतर 2 अष्टपैलू खेळाडूंसह टीम इंडियाला मैदानात उतरू शकते. दुसरीकडे, दुसऱ्या वनडेसाठी गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकतात. तर स्पिनर कुलदीप यादवचाही संघात समावेश केला जाऊ शकतो.
कुठे पाहाल सामना?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांपैकी दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळवला जाईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तसेच, या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाईल. या सामन्यांचं थेट प्रक्षेपण डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसरी वनडे :
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
महत्त्वाच्या इतर बातम्या :