India Tour to South Africa: भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 26 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयनं कसोटी संघासाठी भारतीय संघाची घोषणा झालीय. येत्या काही दिवसांत एकदिवसीय संघाची घोषणा होऊ शकते. दरम्यान, निवड समिती भारतात सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy) चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर लक्ष ठेवून आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताचा सलामीवर शिखर धवन (Shikhar Dhawan) पुनारागमन करण्याची शक्यता व्यक्त जातेय. परंतु, या स्पर्धेत त्यानं निराशाजनक कामगिरी केलीय. तर, दुसरीकडं ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आक्रमक फलंदाजी करीत आहे. यामुळं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शिखर धवनचं स्थान धोक्यात असल्याचं संकेत मिळत आहेत. 


विजय हजारे ट्रॉफीत शिखर धवनला काही खास कामगिरी करता आली नाही. दिल्लीच्या संघाकडून खेळताना शिखर धवननं मागील तीन सामन्यात 14, 12 आणि 0 धावा केल्या आहेत. यामुळं शिखर धवनच्या पुनारागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तर, दुसरीकडं ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडनं सलग तीन सामन्यात शतक ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. तर, व्यंकटेश अय्यरनंही या स्पर्धेत दोन शतक झळकावली आहेत. 


दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऋतुराज गायकवाड भारतासाठी सलामी देऊ शकतो. तर, व्यंकटेश अय्यर भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची जागा घेण्याची शक्यता दर्शवली जातेय. विजय हजारे ट्रॉफीत व्यंकटेश बॅटसह चेंडूनंही विकेट्स घेतले आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. 


हे देखील वाचा- 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha