सिडनी : बहुचर्चित अशा अॅशेस मालिकेला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडवर (England) दमदार असा विजय मिळवला. पण या विजयानंतरच दुसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसला आहे. दमदार फॉर्ममध्ये असणारा त्यांचा गोलंदाज जोश हेझलवुड (Josh hazlewood) अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्याला मुकणार आहे. जोश दुखापतीमुळे दुसरा सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे आता त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागेल.



असा मिळवला पहिल्या सामन्यात विजय


पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का बसला होता. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 147 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने पाच बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिला डावात धावांचा डोंगर उभारला. ट्रेव्हिस हेडने 152 धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 425 धावा उभारत 278 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव ऑस्ट्रेलियाने 297 धावांवर गुंडाळला. ज्यामुळे विजयासाठी आवश्यक केवळ 20 धावा इंग्लंडने एक विकेट गमावत पूर्ण केल्या आणि सामना 9 विकेट्सनी जिंकला. 


अॅशेस मालिकेतील उर्वरीत सामने


अॅशेस मालिकेतील दुसरा सामना 16-20 डिसेंबर दरम्यान अॅडलेड येथे होणार आहे. तिसरा सामना 26-30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न आणि चौथा कसोटी सामना 5-9 जानेवारी दरम्यान सिडनी येथे पार पडणार आहे. तर, पाचवा कसोटी सामना 14-18 जानेवारी दरम्यान होबार्ट येथे खेळवला जाणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha