Rohit Sharma: दक्षिण आफ्रिकेच्या (SA Vs IND) दौऱ्यापासून रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय एकदिवस संघाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय संघाला पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यापूर्वी बीसीसीआयशी (BCCI) बोलताना रोहितनं अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान, भारतीय संघाला 2013 पासून आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता न आल्याची त्यानं खंत व्यक्त केलीय. तसेच भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? या विषयावरही त्यानं भाष्य केलंय. 


बीसीसीआयनं रोहित शर्मानं दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. ज्यात रोहित म्हणाला की, "पुढील काळात अनेक विश्वचषक पाठोपाठ खेळले जाणार आहेत. आम्हाला चॅम्पियनशिप जिंकायची आहेच, पण त्यासाठी काही महत्वाच्या बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कोणताही विश्वचषक जिंकायचा असेल तर, काही गोष्टींवर लक्ष ठेवणं महत्वाचं असतं. सुरुवातीपासूनच आपण ध्येयाचा विचार न करता प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. भारताला 2013 पासून एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. आम्हाला विजयाच्या जवळ जाऊन पराभव स्वीकारावा लागलाय. यामधील अंतर मिटवणं गरजेचं आहे".


व्हिडिओ-



भारतानं 2013 मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिकंली


महत्वाचं म्हणजे, भारतीय क्रिकेट संघानं माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यांनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. आता रोहित शर्मावर 2022 चा टी-20 विश्वचषक आणि 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची जबाबदारी आहे. 


हे देखील वाचा- 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha