ODI Captain Rohit Sharma : टी-20 कर्णधारपदानंतर रोहित शर्माकडे एकदिवसीय सामन्याचेही नेतृत्व देण्यात आलं आहे. भारतीय संघाच्या निवड समितीने याबाबतची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. त्याचवेळी एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं. तसंच कसोटी संघाच्या उपकर्णधारपदीही रोहित शर्माची निवड करण्यात आली. या मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्यानंतर रोहितने प्रथमच याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयने या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.


रोहित व्हिडीओमध्ये बोलताना म्हणाला, 'भारताकडून क्रिकेट खेळताना तणाव तर असतोच. अनेकजण तुमच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात. पण माझ्यासाठी एक क्रिकेटर म्हणून एक कर्णधार म्हणून नाही, तर एक क्रिकेटर म्हणून माझ्या खेळावर फोकस करणं अधिक महत्त्वाचं आहे. लोक काय म्हणतात यापेक्षा मी कसा खेळतो हे अधिक महत्त्वाचं आहे. लोक काय म्हणतात यावर आपण काही करु शकत नाही. त्यामुळे खेळावर लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे.'


'एक संघ म्हणून आमची कामगिरी महत्त्वाची' 


पुढे बोलताना रोहितने एक संघ म्हणून आम्ही कशी कामगिरी करतो हेही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. तसंच एकत्र क्रिकेट खेळताना कोण कोणाबद्दल काय बोलत आहे, यापेक्षा आम्ही एकमेंकाबद्दल काय विचार करतो आणि एक संघ म्हणून कसे खेळतो हे अधिक महत्त्वाचे आहे. असंही रोहित म्हणाला.



दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेट किपर), वृद्धीमान साहा (विकेट किपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शामी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज


स्टँड बाय प्लेअर - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जान नागव्सल्ला


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha