India T20 World Cup Squad नवी दिल्ली : टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup)1 जून सुरु होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेकडून संयुक्तपणे टी-20 वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आयसीसीनं (ICC) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांना टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर करण्यासाठी 1 मेची मुदत दिलेली आहे. भारतीय चाहते टी-20 वर्ल्डकपसाठी संघात कुणाला संधी मिळणार याची वाट पाहत आहेत. बीसीसीआयची निवड समिती लवकरच टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ (Team India Squad) जाहीर करेल, अशी माहिती आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करावी लागणार आहे.  


अंतिम निर्णयापूर्वी आणखी एक बैठक


बीसीसीआयचा प्रमुख निवड समिती सदस्य अजित आगरकर आज अहमदाबादमध्ये निवड समिती  सदस्यांसोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर भारतीय संघ जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे. 
 
 निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर 27 एप्रिल दिल्लीत पोहोचला  होता. तिथं रोहित शर्मा आणि राहुल द्रविड सोबत त्याची बैठक झाली होती. आज होणाऱ्या चर्चेनंतर टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. आयसीसीनं 1 मेची डेडलाईन दिलेली असली तरी आज देखील टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते.  


संभाव्य टीम इंडिया :  रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (उपकॅप्टन), रिषभ पंत (विकेटकीपर), रिंकू सिंग, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे.


टी20 वर्ल्ड कप मध्ये भारताचे सामने कधी?


टी20 वर्ल्ड कपमध्ये  भारत अ गटात आहे. भारताची पहिली मॅच आयरलँड विरुद्ध होणार असून दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध होईल. वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज लढत भारत आणि पाकिस्तान 9  जूनला आमने सामने येणार आहेत.भारताची तिसरी मॅच यूएस आणि चौथी मॅच 15 जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे. 



भारताला दुसऱ्या विजेतेपदाची आशा


भारतीय टीमनं पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. तो वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत झाला होता. पहिल्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत भारतानं पाकिस्तानला पराभूत करत विजय मिळवला होता. भारताला पहिल्या विजेतेपदानंतर दुसऱ्यांदा विजेतेपद मिळालेलं नाही.  टी20 वर्ल्ड कप मध्ये भारतानं आतापर्यंत 44 मॅच खेळल्या आहेत. भारताला 15 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. तर, 27 मॅचमध्ये भारताला विजय मिळाला आहे. तर, एक मॅच टाय झाली तर एक मॅच रद्द झाली.  


संबंधित बातम्या :


दिल्लीच्या फलंदाजांचं लोटांगण, कुलदीप एकटाच भिडला, कोलकात्यासमोर 154 धावांचं आव्हान


T20 World Cup 2024:रिषभ पहिली चॉईस, संजूची संधी हुकणार?, केएल. राहुलबाबत साशंकता, टीम इंडियामध्ये कुणाला संधी?