DC vs KKR Inning Report: कोलकात्याच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. दिल्ली कॅपिटल्सच्या एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. कुलदीप यादव यानं तळाला एकट्यानं लढा दिला. कोलकात्याच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा संघ 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 153 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीकडून कुलदीप यादव यानं सर्वाधिक धावा केल्या. कुलदीप यादव यानं नाबाद 34 धावांची खेळी केली. त्याशिवाय इतर एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या गाठता आली नाही. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वरुण चक्रवर्ती यानं तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. कोलकात्याला विजयासाठी 120 चेंडूमध्ये 154 धावांची गरज आहे. 


दिल्लीची खरा सुरुवात 


नाणेफेक जिंकून पृथ्वी शॉ यानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कोलकात्याच्या माऱ्यासमोर दिल्लीचे फलंदाज ढेर झाले. दिल्लीची सुरुवात अतिशय खराब झाली. आघाडीचे सर्वच फलंदाज एकापाठोपाठ एक ठरावीक अंतरानं तंबूत परतले. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ सात चेंजूत 13 धावा काढून बाद झाला. यामध्ये तीन चौकारांचा समावेश होता. तर जेक मॅकगर्क यानं सात चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 12 धावांचं योगदान दिलं. शाय होप यालाही दिल्लीचा डाव सावरता आला नाही. होप तीन चेंडूत सहा धावा काढून बाद झाला. 37 धावांवर दिल्लीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. 


कोलकात्याचा भेदक मारा 


कर्णधार ऋषभ पंत आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांची जोडी जमली असे वाटत होते. पण हर्षित राणाने अभिषेक पोरेल याचा अडथळा दूर केला. पोरेल यानं 15 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर पंत यानं अक्षरच्या साथीनं डाव सावरण्यास सुरुवात केली. पण वरुण चक्रवर्ती यानं ऋषभ पंत याला फसवलं. पंत 20 चेंडूत 27 धावा काढून बाद झाला. यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. स्ट्रिस्टन स्टबसही फारकाही करु शकला नाही. पंतपाठोपाठ तोही तंबूत परतला. त्याला फक्त चार धावा काढता आल्या. 


कुलदीपची शानदार खेळी


दिल्लीच्या फलंदाजांनी हरिकिरी केल्यामुळे दिल्लीला इम्पॅक्ट प्लेअरला मैदानात उतरावावे लागले. पण काहीच उपयोग झाला नाही. ठरावीक अंतराने विकेट पडल्यात. अक्षर पटेल 15 धावा काढून बाद झाला. त्याशिवाय कुमार कुशाग्र हाही फक्त एक धाव काढून तंबूत परतला. रसाक सलाम यानं आठ धावांची खेळी केली. एकीकडे विकेट पडत असताना कुलदीप यादव यानं मात्र लढा दिला. त्यानं दिल्लीची खिंड लढवली. कुलदीप यादव यानं रसिक सलाम याच्या साथीनं डाव सावरला. कुलदीप यादव यानं 26 चेंडूमध्ये 35 धावांचं योगदान दिले. यामध्ये पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. 


फिरकीचा भेदक मारा



दिल्लीकडून वरुण चक्रवर्ती यानं सर्वात भेदक मारा केला. वरुण चक्रवर्ती यानं चार षटकात 16 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. तर हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन दोन फलंदाजांची शिकार केली. मिचेल स्टार्क आणि सुनील नारायण यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.