India T20 World Cup squad : जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी विराट कोहली टीम इंडियाच्या संघात असायला हवा, असा सल्ला कर्णधार रोहित शर्मानं निवडकर्ते आणि बीसीसीआयला (BCCI) दिला आहे. ईएसपीएन क्रिक इन्फोनं याबाबतचं वृत्त दिले आहे. आगामी टी20 विश्वचषकासाठी दोन दिवसांत टीम इंडियाची निवड होणार आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्यामध्ये चर्चा झाली. यामध्ये रोहित शर्मानं विराट कोहली संघात हवा, ज्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजीला ताकद मिळेल, असा सल्ला दिला आहे. आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
रोहित शर्माचा सल्ला काय आहे?
ईएसपीएन क्रिक इन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघात विराट कोहलीचा समावेश करावा, अशी मागणी भारतीय कर्णधार रोहित शर्मानं निवड समितीकडे केली आहे. विराट कोहलीच्या समावेशामुळे भारतीय संघाची ताकद वाढेल. विराटचा अनुभव आणि शांत फलंदाजी टीम इंडियाला फायदेशीर ठरेल.
एकापेक्षा एक धाडक खेळाडू रांगेत -
रोहित शर्मा, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचं संघातील स्थान निश्चित झालेय. पण निवड समितीची डोकेदुखी इथेच सुरु होते. मध्यक्रममध्ये एकापेक्षा एक धाडक फलंदाजांनी दावा ठोकला आहे. त्यामध्ये शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांचाही समावेश आहे. या दोन्ही फलंदाजांना संघात ठेवल्यास एका विकेटकीपर अथवा गोलंदाजाला बाहेर बसवावं लागणार आहे. आशा स्थितीमध्ये गोलंदाजी अथवा विकेटकीपिंगची बाजू कमकुवत होऊ शकते.
वेगवान गोलंदाजीही चिंतेचा विषय
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या फॉर्मात आहे, त्याचं संघातील स्थान निश्चित आहे. पण त्याच्या जोडीला इतर वेगवान गोलंदाज कोणते असतील? हा चिंचेता विषय आहे. मोहम्मद शामी दुखापतग्रस्त असल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप यांची नावे चर्चेत आहेत. या दोघांना आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय या दोघांवर विश्वास दाखवणार की नव्या खेळाडूंना संधी देणार.. याबाबत लवकरच स्पष्ट होईल.
भारतीय संघाकडे धाडक खेळाडू
टॉप आर्डर: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव
मिडिल अॅण्ड लोअर मिडिल आर्डर : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शिवम दुबे, रिंकू सिंह
स्पिनर : कुलदीप यादव
वेगवान गोलंदाज: जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंह, आवेश खान/मोहम्मद सिराज
इतर दावेदार: केएल राहुल, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, संदीप शर्मा