मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) कॅप्टन रोहित शर्माचा (Rohit Sharma Birthday) आज वाढदिवस आहे. रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. रोहित शर्मानं आपल्या बॅटिंगच्या जोरावर गेल्या 14 वर्षांहून अधिक काळ टीम इंडियासाठी योगदान दिलं आहे. रोहित शर्मानं ऐतिहासिक कारकिर्दीत काही विक्रम नावावर केले आहेत. ते तोडणं अनेकांना जवळपास मुश्कील आहे. रोहितचे पाच विक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत. 


एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं


रोहित शर्मानं वनडेमध्ये तीन द्विशतकं झळकावली होती. रोहितनं पहिलं द्विशतक 2 सप्टेंबर 2013 मध्ये केलं होतं. रोहितनं हे द्विशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलं होतं, त्यानं 209 धावांची खेळी केली होती. 13 नोव्हेंबर 2014 रोजी त्यानं श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर 264  धावांची खेळी केली होती. यानंतर रोहितनं पुन्हा एकदा श्रीलंकेविरुद्ध द्विशतक झळकावलं होतं. त्यानं मोहालीच्या स्टेडियमवर नाबाद 208 धावांची खेळी केली होती. 


वनडेतील सर्वाधिक धावसंख्या


रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम देखील नोंदवला गेला  आहे. रोहित शर्माच्या नावावर 264 धावांची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. रोहित शर्मानं 173 बॉलमध्ये 9 षटकार आणि 33 चौकारांच्या जोरावर 264 धावांची खेळी केली होती. 



एका डावात सर्वाधिक चौकार


रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये 264 धावांची खेळी केली होती त्यामध्ये त्यानं 33 चौकार मारले होते. वनडे क्रिकेटमधील हा विक्रम देखील गेल्या 10 वर्षांमध्ये अजून कोणी मोडू शकलेलं नाही. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागनं एका डावात प्रत्येकी 25-25 षटकार मारले आहेत. 


वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांची नोंद


रोहित शर्मानं वर्ल्डकपमध्ये देखील जोरदार फलंदाजी केलेली आहे. रोहित शर्मानं एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्यानं एका वर्ल्ड कपमध्ये 5 शतकं केली आहेत.  2019 च्या वर्ल्डकपमध्ये त्यानं पाच शतकं केली होती.  


सिक्सर किंग रोहित शर्मा


रोहित शर्मा केवळ वनडे क्रिकेट नव्हे तर कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये देखील हिट आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिक्सर किंग म्हटलं जातं.  रोहित शर्माच्या नावावर 597 षटकारांची नोंद आहे. रोहितच्या जवळपास देखील कोणी नसल्याचं चित्र आहे. रोहित शर्मानं हे षटकार 472 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेचले आहेत. रोहित शर्मानंतर ख्रिस गेल दुसऱ्या स्थानावर असून त्यानं 553 षटकार मारले आहेत. तिसऱ्या स्थानी शाहिद आफ्रिदी असून त्यानं 524 षटकार मारले आहेत.    
 
दरम्यान, रोहित शर्मानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार 709 धावा केल्या असून 48 शतकांची नोंद त्याच्या नावावर आहे. टी-20 त सर्वाधिक शतकं त्याच्या नावावर आहेत. 


संबंधित बातम्या :


T20 World Cup 2024 : विराट कोहली संघात हवाच, रोहित शर्मानं BCCI ला दिला सल्ला


 भारत-पाक सामन्यासाठी ऑस्ट्रेलियावरुन आणली खेळपट्टी, जाणून घ्या काय आहे खास