Ind vs Sa 1st Test : 8 डावांत 4 शतकं, 1 अर्धशतक! ऋषभ पंत परतला तरी ध्रुव जुरेलला बाहेर कसं ठेवणार गौतम गंभीर? प्लेइंग-11 मधून कोणाचा पत्ता कट?
Rishabh Pant or Dhruv Jurel India Playing 11 Marathi News : भारताचा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल याने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीत दुसऱ्या डावातही शतक झळकावलं.

India Playing 11 vs South Africa 1st Test News : भारताचा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल याने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीत दुसऱ्या डावातही शतक झळकावलं. के.एल. राहुल, अभिमन्यू ईश्वरन आणि साई सुदर्शन यांसारखे अनुभवी फलंदाज दोन्ही डावांत अपयशी ठरले असताना जुरेलने शानदार खेळी करत संघाला सावरण्याचं काम केलं. या फॉर्ममुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतच्या पुनरागमनानंतरसुद्धा जुरेलने संघात जागेसाठी दावा ठोकला आहे.
8 डावांत 4 शतकं, 1 अर्धशतक!
अलीकडच्या काळात ध्रुव जुरेल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागील आठ डावांमध्ये (आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी सामन्यांसह) त्याने 4 शतके आणि 1 अर्धशतक ठोकले आहेत. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध लखनऊ येथे झालेल्या पहिल्या अनधिकृत कसोटीत त्याने 140 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात फक्त 1 धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.
Dhruv Jurel’s life lately: Wake up, score a 100 for your team, repeat! 💯💗 pic.twitter.com/KNVkJ9iVXd
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 8, 2025
यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने 125 धावा केल्या, तर दुसऱ्या कसोटीत 44 आणि 6* धावा केल्या. आता दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीत त्याने दोन्ही डावांत शतक ठोकत दमदार कामगिरी कायम ठेवली. पहिल्या डावात त्याने नाबाद 132 धावा केल्या आणि खालच्या क्रमाच्या फलंदाजांसोबत भागीदारी करत संघाला 255 धावांपर्यंत नेलं. अशा सातत्यपूर्ण प्रदर्शनानंतर ध्रुव जुरेलला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवणं कठीण झालं आहे.
140, 1, 56, 125, 44, 6*, 132*, 127* - Dhruv Jurel’s last eight first-class innings. Is he making a case as a pure batter? 👀 pic.twitter.com/u36CPpW3V0
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 8, 2025
ऋषभ पंतचं भारतीय कसोटी संघात पुनरागमन निश्चित
दरम्यान, ऋषभ पंतचं भारतीय कसोटी संघात पुनरागमन निश्चित झालं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची दोन कसोट्यांची मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत पंत पुन्हा संघात परतणार असून, वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत विकेटकीपर म्हणून खेळलेला ध्रुव जुरेल आता फलंदाज म्हणून प्लेइंग 11 मध्ये नितीश कुमार रेड्डीच्या जागी दिसू शकतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ- (India Test Squad vs South Africa 2025 Test)
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.
भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)
- पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)
- दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)
- पहिला एकदिवसीय सामना: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)
- दुसरा एकदिवसीय सामना: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)
- तिसरा एकदिवसीय सामना: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)
- पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम, कटक)
- दुसरी टी-20: 11 डिसेंबर (पीसीए स्टेडियम)
- तिसरी टी-20: 14 डिसेंबर (एचपीसीए स्टेडियम)
- चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)
- पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)





















