(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताची प्रथम फलंदाजी, संजू सॅमसनला संधी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IND vs AFG : अफगाणिस्तानविरोधातील अखेरच्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे.
IND vs AFG : अफगाणिस्तानविरोधातील अखेरच्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजील करण्याचा निर्णय घेतलाय. भारतदाच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. तर अफगाणिस्तान संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना जिंकून भारत निर्वादित वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे शेवट गोड करण्यासाठी अफगाण फौज मैदानात उतरेल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये बुधवारी एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होणार आहे. भारतीय वेळानुसार, संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. अखेरच्या सामन्यात भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. संजू सॅमसनला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली आहे. तर जितेश शर्मा याला आराम देण्यात आला आहे.
भारताची प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान
अफगानिस्तानची प्लेईंग 11 -
रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), इब्राहिम जादरान (कर्णधार), गुलबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, शराफुद्दीन अशरफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम सफी, फरीद अहमद मलिक
मालिकेत भारताचे निर्वादित वर्चस्व -
तीन सामन्याच्या टी 20 मलिकेत भारताने निर्वादित वर्चस्व गाजवलं. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यात अफगाण संघाचा पराभव केला. भारताकडून शिवब दुबे याने अष्टपैलू कामगिरी केली. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रभावी मारा केला. कर्णधार रोहित शर्मा याला फलंदाजीत अपयश आले. दोन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झालाय. अखेरच्या सामन्यात रोहित शर्माला मोठी खेळी करण्याची संधी असेल. आयपीएलपूर्वी भारताचा हा अखेरचा टी 20 सामना असेल.