Ind vs Aus 3rd Test : ॲडलेड टेस्टनंतर 'सँडपेपर' पुन्हा चर्चेत, भारतीय चाहत्यावर कारवाई; नेमकं काय घडलं? Video आला समोर
क्रिकेटविश्वात जेव्हा जेव्हा सँडपेपरचा उल्लेख होतो, तेव्हा तेव्हा चाहत्यांना ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेत केलेल्या बॉल टॅम्परिंगची घटना आठवते.
India Fan Pokes Sandpaper Controversy In Adelaide : क्रिकेटविश्वात जेव्हा जेव्हा सँडपेपरचा उल्लेख होतो, तेव्हा तेव्हा चाहत्यांना ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेत केलेल्या बॉल टॅम्परिंगची घटना आठवते. ज्याने संपूर्ण जग हादरले होते. आता पुन्हा एकदा सँडपेपर चर्चेत आला आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीदरम्यान एका भारतीय चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या हातात सँडपेपर दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओतून समोर आले आहे की, एका भारतीय चाहत्याने स्टेडियममध्ये सँडपेपर आणल्यामुळे त्याला स्टेडियम बाहेर काढले. 2018 मध्ये कांगारूंवर बॉल टॅम्परिंगचे आरोप करण्यात आले होते. जेव्हा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गकबेरहा येथे खेळला जात होता. या सामन्यात कॅमेरन बॅनक्रॉफ्ट सँडपेपरने चेंडू घासताना दिसला. जेणेकरून चेंडू खडबडीत होईल आणि रिव्हर्स स्विंग अधिक होईल. ज्यामुळे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.
भारतीय चाहत्याने सोबत सँडपेपर आणला
या चाहत्याने भारतीय संघाची टेस्ट जर्सी घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात सँडपेपर आहे आणि सुरक्षा रक्षक त्याला बाहेर जाण्यास सांगत आहेत. यावेळी काही ऑस्ट्रेलियन चाहते टाळ्या वाजवतानाही दिसले. सुरक्षा रक्षकांनी चाहत्याला जबरदस्तीने स्टँडबाहेर काढले. दक्षिण आफ्रिकेत सँडपेपरसोबत चेंडूशी छेडछाड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर बरीच टीका झाली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर 12 महिन्यांची, तर कॅमेरून बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली होती.
"An Indian fan was kicked out of the stadium for showing sandpaper during the India vs Australia Test match in Adelaide . #AUSvIND #INDvsAUS pic.twitter.com/kYK0zInYSv
— Evil Kicks Money (@EvilkicksMoney) December 9, 2024
ॲडलेडमध्ये भारताची लाजिरवाणी कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत फ्लॉप ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात केवळ 180 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या आणि 157 धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावातही भारतीय संघ काही विशेष करू शकला नाही आणि 175 धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य दिले, जे यजमान संघाने कोणतेही नुकसान न करता पूर्ण केले. अशाप्रकारे आता मालिका 1-1 अशी बरोबरीत असून तिसरी कसोटी 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे होणार आहे.
हे ही वाचा -