एक्स्प्लोर

राहुल द्रविडने जिवंत केल्या भारतीय क्रिकेटच्या परंपरा; शास्त्री-कोहलींच्या काळात झाल्या होत्या लुप्त

Rahul Dravid : राहुल द्रविड यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक छोट्या गोष्टींवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

Rahul Dravid : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाला नव्या उंचीवर नेले होते. काही संस्मरणीय विजयदेखील या जोडीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना अनुभवता आले. रवी शास्त्रींच्याऐवजी राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाल्यानंतर टीम इंडियाची पुनर्बांधणी होईल असा कयास बांधला जात आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमधील जुन्या परंपरा सुरू केल्या आहेत. या परंपरा कोहली-शास्त्री यांच्या काळात बंद करण्यात आल्या होत्या.

कसोटी सामन्यानंतर ग्राउंड्समॅनला बक्षिसे देण्याची परंपरा राहुल द्रविड यांनी पुन्हा सुरू केली. कानपूर येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर 35 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतरही वानखेडेवरील ग्राउंड्समॅनला 35 हजारांचे बक्षीस देण्यात आले. चांगली खेळपट्टी तयार केल्याबद्दल हे बक्षीस देण्यात आले. ही जुनी परंपरा लुप्त होत चालली होती. 

कसोटी संघात नवीन खेळाडूचे पदार्पण झाल्यानंतर त्याला कसोटी संघाची कॅप देण्यात येते. कपिल देव ते धोनी यांच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात ही परंपरा सुरू होती. कोहली-शास्त्रींच्या काळात पहिला सामना खेळणाऱ्या क्रिकेटपटूला संघातील ज्येष्ठ सहकारी, कोच यांच्या हस्ते टेस्ट कॅप दिली जायची. राहुल द्रविड यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर नव्या खेळाडूला टीम इंडियाच्या माजी दिग्गज खेळाडूंच्या हस्ते टेस्ट कॅप देण्यास सुरुवात झाली आहे. भारताचे माजी दिग्गज कसोटीपटू, लिटील मास्टर सुनिल गावस्कर यांच्या हस्ते श्रेयस अय्यर याला टेस्ट कॅप देण्यात आली. 

राहुल द्रविड यांनी आणखी एक निर्णय घेतला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. टीम इंडियाच्या कसोटी संघामध्ये निवड होण्यासाठी इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) कामगिरीचा विचार केला जाणार नाही. त्याशिवाय एखाद्या खेळाडूला संघात पुनरागमन करायचे असल्यास त्यांना त्याला स्थानिक सामन्यात फिटनेस आणि फॉर्म सिद्ध करावे लागणार आहे. अनिल कुंबळे हे टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना असाच निर्णय घेण्यात आला होता. अनफिट आणि खराब फॉर्म असलेल्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागत होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs CSK IPL 2026 Live Score : जडेजाचा कहर! एका ओव्हरमध्ये खेळ फिरवला, सरफराज-दुबे OUT; CSK संकटात 57/6, जाणून घ्या LIVE अपडेट्स
RR vs CSK Live Update : जडेजाचा कहर! एका ओव्हरमध्ये खेळ फिरवला, सरफराज-दुबे OUT; CSK संकटात 57/6, जाणून घ्या LIVE अपडेट्स
IPL 2026 Bangladesh Broadcast : आधी माज, मग गुडघ्यावर... अन् आता पुन्हा धक्का! बांगलादेशमध्ये होणार नाही IPLचे प्रसारण; अवघ्या 48 तासांत गेम फिरला, नेमकं काय घडलं?
आधी माज, मग गुडघ्यावर... अन् आता पुन्हा धक्का! बांगलादेशमध्ये होणार नाही IPLचे प्रसारण; अवघ्या 48 तासांत गेम फिरला, नेमकं काय घडलं?
IPL 2026 Playoff Predictions : चेन्नई OUT, मुंबई-बंगलुरू IN... आयपीएलमध्ये होणार मोठा उलटफेर? प्लेऑफपूर्वीच शशांक सिंगच्या भाकिताने खळबळ
चेन्नई OUT, मुंबई-बंगलुरू IN... आयपीएलमध्ये होणार मोठा उलटफेर? प्लेऑफपूर्वीच शशांक सिंगच्या भाकिताने खळबळ
IPL 2026 News : प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रपोज करायला गेला अन् पोपट झाला, MI vs KKR सामन्यांत वानखेडे स्टेडियमवर काय घडलं?, Video
प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रपोज करायला गेला अन् पोपट झाला, MI vs KKR सामन्यांत वानखेडे स्टेडियमवर काय घडलं?, Video

व्हिडीओ

Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
Iran War Live Update: आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
Ebrahim Zolfaghari: मुस्लिम देशांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
अरब राष्ट्रांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Share Market Crash : सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात ब्लॅक Monday, गुंतवणूकदारांना मोठा फटका, 10 लाख कोटी स्वाहा
सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात ब्लॅक Monday, गुंतवणूकदारांना मोठा फटका, 10 लाख कोटी स्वाहा
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
Embed widget