ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी BCCI ने केली टीम इंडियाची अन् नवीन कर्णधाराची घोषणा, पाहा वेळापत्रक अन् कोणाला मिळाली संधी?
Radha Yadav To Lead India A Women on Australia Tour : गुरुवारी (10 जुलै) बीसीसीआयच्या महिला निवड समितीने या दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे.

India A Women Squad For Australia Tour : भारताचा पुरुष आणि महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. काही काळापूर्वी पुरुष अ संघही तिथे गेला होता. पण महिला अ संघ बऱ्याच काळापासून परदेशी दौऱ्यावर गेला नाही, परंतु यावर्षी त्यांना ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यादरम्यान, दोन्ही संघ तिन्ही स्वरूपात सामने खेळणार आहेत, ज्यामध्ये 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि एक बहु-दिवसीय सामना समाविष्ट आहे.
गुरुवारी (10 जुलै) बीसीसीआयच्या महिला निवड समितीने या दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने दोन स्वतंत्र संघांची निवड केली आहे, परंतु कर्णधारपदाची जबाबदारी राधा यादव यांच्या खांद्यावर राहील तर मिन्नू मणी त्यांच्या उपकर्णधारपदी राहतील. भारत अ संघ 7 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या अंतर्गत तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि 1 चार दिवसीय सामना खेळवला जाईल.
शेफाली वर्मा आणि श्रेयंका पाटील सारख्या स्टार मिळाली संधी
सीनियर संघाची धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्माचीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ महिला संघात निवड झाली आहे. शेफाली सध्या इंग्लंड दौऱ्यावरील टी-20 मालिकेचा भाग आहे. याशिवाय सजना सजीवन, उमा छेत्री, श्रेयंका पाटील, राघवी बिष्ट आणि टी. साधू यांनाही स्थान मिळाले आहे.
🚨 NEWS 🚨
— BCCI Women (@BCCIWomen) July 10, 2025
Squad for India A Women’s Tour of Australia 2025 announced.
Details 🔽 #TeamIndiahttps://t.co/gKV1iYvMxl
पण, श्रेयंकाची निवड फिटनेसवर अवलंबून असेल. जर ती दौऱ्याच्या वेळेपर्यंत तंदुरुस्त झाली नाही तर तिच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी संधी मिळू शकते. दुखापतीमुळे श्रेयंका बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. तिने WPL 2025 मध्येही भाग घेतला नव्हता.
भारत अ महिला टी-20 संघ : राधा यादव (कर्णधार), मिन्नू मणी, शफाली वर्मा, डी. वृंदा, सजना सजीवन, उमा चेत्री, रघवी बिस्त, श्रेयंका पाटील*, प्रेमा रावत, नंदिनी कश्यप, तनुजा कंवर, जोशिता व्हीजे, शबनम शकील, साईमा ठाकरे, तितास साधू.
भारत अ महिला एकदिवसीय आणि बहु-दिवसीय संघ : राधा यादव, मिन्नू मणी , शफाली वर्मा, तेजल हसबनीस, राघवी बिस्त, तनुश्री सरकार, उमा चेत्री, प्रिया मिश्रा*, तनुजा कंवर, नंदिनी कश्यप , धारा गुजर, जोशिता व्हीजे, शबनम शकील, साईमा ठाकोर, तितास साधू.
भारत अ महिला संघ ऑस्ट्रेलियाचे संपूर्ण वेळापत्रक दौरा -
- पहिला टी-20 - 7 ऑगस्ट, मॅके
- दुसरा टी-20 - 9 ऑगस्ट, मॅके
- तिसरा टी-20 - 10 ऑगस्ट, मॅके
- पहिला एकदिवसीय सामना - 13 ऑगस्ट, नॉर्थ्स
- दुसरा एकदिवसीय सामना - 15 ऑगस्ट, नॉर्थ्स
- तिसरा एकदिवसीय सामना - 17 ऑगस्ट, नॉर्थ्स
- बहु-दिवसीय सामना - 21 ते 24 ऑगस्ट, अॅलन बॉर्डर फील्ड





















