IND vs ENG U19 1st Test : 540 धावांचा डोंगर! आयुषचे शतक, तर 4 पठ्ठ्याचे अर्धशतके, टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंचा तांडव, इंग्लंडला फुटला घाम
England vs India U19 1st Test : भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली आणि 540 धावा केल्या.

England U19 vs India U19, 1st Youth Test : भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली आणि 540 धावा केल्या. संघाचा कर्णधार आयुष महात्रेची शतकी खेळी आणि विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू, राहुल कुमार आणि आरएस अंबरीश यांच्या अर्धशतकी खेळीने भारताला या मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली.
आयुषचे शतक, तर 4 पठ्ठ्याचे अर्धशतके....
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) फक्त 14 धावांवर बाद झाला, परंतु संघाचा कर्णधार आयुष महात्रेने (Ayush Mhatre Hundred) शानदार खेळी करत 102 धावांची शतकी खेळी खेळली. आयुष आऊट झाल्यानंतर विहाननेही चांगली खेळी केली आणि त्याने 67 धावांवर आपली विकेट गमावली. यानंतर, मौल्यराज सिंह चावडाची विकेट लवकरच पडली आणि तो 8 चेंडूत 11 धावा करून बाद झाला.
HUNDRED FOR CAPTAIN AYUSH MHATRE 💛
— Johns. (@CricCrazyJohns) July 12, 2025
- First four day match against England U-19, Captain stands for India, scored Hundred from just 107 balls, What a knock, the future of Indian Cricket is here. pic.twitter.com/VbtGDDBUyk
संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडूने संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली, परंतु तो 90 धावांवर म्हणजेच शतकाच्या जवळ बाद झाला. अभिज्ञानने ही खेळी 95 चेंडूत एक षटकार आणि 10 चौकारांसह खेळली, तर राहुल कुमारनेही वेगवान गतीने धावा केल्या आणि त्याने 81 चेंडूत एक षटकार आणि 14 चौकारांसह 85 धावा केल्या. शतकाच्या जवळ आल्यानंतर राहुल देखील बाद झाला.
आरएस अम्ब्रिसनेही पहिल्या डावात चांगले हात दाखवले आणि सातव्या क्रमांकावर येत 124 चेंडूत 12 चौकारांसह 70 धावांची चांगली खेळी खेळली. याशिवाय, मोहम्मद इनाननेही संघासाठी 23 धावांचे योगदान दिले तर हेनिल पटेलनेही 38 धावांची उपयुक्त खेळी केली. इंग्लंडकडून अॅलेक्स ग्रीन आणि राल्फी अल्बर्टने 3-3 बळी घेतले. जॅक होम आणि आर्ची वॉनने 2-2 यश मिळवले.
हे ही वाचा -





















