Eng vs Ind 3rd Test : क्रॉलीच्या ड्रामाचं भांड अखेर फुटलं! चौथ्या दिवशी बुमराहने केली पोलखोल, व्हिडीओ पाहून भडकले चाहते
England vs India 3rd Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या 10 मिनिटांचा खेळ कोणीही विसरू शकत नाही.

Zak Crawley Exposed After Lord's Test Day 3 Heated Argument : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या 10 मिनिटांचा खेळ कोणीही विसरू शकत नाही. भारतीय संघ 387 धावा करून ऑलआऊट झाला होता आणि शेवटचे 2 षटके खेळायची होती. पण इंग्लिश सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांचा हेतू जरा वेगळा होता. त्यांना एका षटकापेक्षा जास्त खेळायचे नव्हते. यासाठी, प्रथम त्यांनी येण्यास उशीर केला, नंतर क्रॉलीने बुमराहला एकदा थांबवले. मग एक चेंडू त्याच्या ग्लोव्हजवर लागला आणि त्याने फिजिओला बोलावले. येथून गोंधळ खूप वाढला.
क्रॉलीचा हा टाइमपास पाहून भारतीय कर्णधार शुभमन गिल संतापला. बुमराह देखील नाराज दिसत होता. यानंतर प्रकरण तापले आणि गिलने दोन्ही इंग्लिश सलामीवीरांशी वाद घातला. त्यानंतर क्रॉली आणि डकेटने जे हवे होते तेच घडले, दुसरे षटक टाकता आले नाही. परंतु यानंतर इंग्लिश मीडिया आणि इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी क्रॉलीचा बचाव केला. त्यांनी सांगितले की, दुखापतीच्या वेळी फिजिओला बोलावणे योग्य आहे. पण क्रॉली वेळ वाया घालवण्यासाठी नाटक करत होता हे स्पष्ट दिसत होते. चौथ्या दिवशी त्याचे सत्य उघड झाले.
Always annoying when you can't get another over in before close 🙄 pic.twitter.com/3Goknoe2n5
— England Cricket (@englandcricket) July 12, 2025
चौथ्या दिवशी क्रॉलीच्या ड्रामाचं भांड अखेर फुटलं...
चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराह डावातील पाचवा षटक टाकत होता. सुरुवातीपासूनच त्याने जॅक क्रॉलीला त्याच्या गोलंदाजीने खूप त्रास दिला. पण पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू बचाव करताना त्याच्या ग्लोव्हजवर सेम त्याच प्रकारे लागला. पण यावेळी ना फिजिओ आला आणि ना त्याने ग्लोव्हज काढून वेळ वाया घालवला. तिसऱ्या दिवशी पहिल्या षटकातही असेच घडले, पण नंतर त्याने फिजिओला बोलावले. यानंतर, कॉमेंट्री करणारे संजय मांजरेकर म्हणाले की, पहा, आज देखील चेंडू कालसारखाच लागला आहे, पण त्याने फिजिओला बोलवले नाही.
Checklist of horrors when you’re up against @Jaspritbumrah93! 😬😮💨
— Star Sports (@StarSportsIndia) July 13, 2025
P.S: 𝗧𝗛𝗘𝗥𝗘 𝗪𝗔𝗦 𝗡𝗢 𝗣𝗛𝗬𝗦𝗜𝗢 𝗕𝗥𝗘𝗔𝗞 𝗧𝗢𝗗𝗔𝗬! 😁😉#ENGvIND 👉 3rd TEST, DAY 4 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/vo6bbH9n2o pic.twitter.com/XUOPojMeNn
मोहम्मद सिराजने बेन डकेटला केले आऊट...
या गोंधळानंतर चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात खूपच मनोरंजक असल्याचा अंदाज लावला जात होता. तेच घडले आणि जेव्हा भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने बेन डकेटला आऊट केले, तेव्हा त्याची प्रतिक्रिया जबरदस्त होती. त्याने डकेटकडे रागाने पाहिले आणि खांद्याला खांदा मारला. या रागातून हे स्पष्ट झाले की तिसऱ्या दिवशी झालेल्या गोंधळाचा हा परिणाम आहे. यानंतर सिराजने डीआरएसच्या मदतीने ऑली पोपलाही आऊट केले.
हे ही वाचा -





















