IND W vs BAR W: शेफालीच्या फटकेबाजीनंतर जेमिमा रॉड्रिग्जची संयमी खेळी, भारताचं बार्बाडोससमोर 163 धावांचं आव्हान
IND W vs BAR W, CWG 2022: कॉमनवेल्थ क्रिकेट स्पर्धेतील तिकीट मिळवण्यासाठी भारत आणि बार्बाडोस यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनं मैदानावर सामना सुरु आहे.
IND W vs BAR W, CWG 2022: कॉमनवेल्थ क्रिकेट स्पर्धेतील तिकीट मिळवण्यासाठी भारत आणि बार्बाडोस (India Women vs Barbados Women) यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून बार्बाडोसनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं चार विकेट्स गमावून बर्बाडोससमोर 163 धावांचं लक्ष्य ठेवलंय. आजच्या सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाचं आव्हान जिवंत राहील. तर, पराभूत झालेल्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल.
ट्वीट-
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं 20 षटकात चार विकेट्स गमावून 162 धावा केल्या. भारताकडून सलामीवी शेफाली वर्मानं 26 चेंडूंत सात चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 43 धावा केल्या. तर जेमिमा रॉड्रिग्जनं 46 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावांची नाबाद खेळी केली. जेमिमाचे हे सातवे अर्धशतक आहे. जेमिमाह आणि दीप्ती यांनी पाचव्या विकेटसाठी 70 धावांची शानदार भागीदारी केली. दीप्ती शर्मानंही नाबाद 34 धावांचं योगदान दिलं.
भारताचा प्लेईंग इलेव्हन संघ:
शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (विकेटकिपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर.
बार्बाडोसचा प्लेईंग इलेव्हन संघ:
डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज (कर्णधार), कायसिया नाइट (विकेटकिपर), किशोना नाइट, आलिया अॅलेने, त्रिशन होल्डर, अलिसा स्कॅंटलबरी, शकेरा सेलमन, शमिलिया कोनेल, शॉन्टे कॅरिंग्टन, शनिका ब्रूस.
हे देखील वाचा-