बांगलादेशचा 120 धावांत खुर्दा, भारतीय महिलांनी केला हिशोब चुकता, मालिकेत 1-1 बरोबरी
IND W vs BAN W 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेश महिला संघाचा पराभव केला आहे.
IND W vs BAN W 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेश महिला संघाचा पराभव केला आहे. भारताने बांगलादेशचा 108 धावांनी पराभव करत हिशोब चुकता केला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केला होता. आज झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे बांगलादेशचा संघ अवघ्या 120 धावांत बाद झाला. जेमिमा रॉड्रिग्सने अष्टपैलू खेळी केली. जेमिमाने फलंदाजीत 86 धावांचे योगदान दिले तर गोलंदाजीत चार विकेट घेतल्या. अष्टपैलू खेळीमुळे जेमिमाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताने दिलेल्या 229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. 38 धावांत बांगलादेशने तीन विकेट गमावल्या होत्या. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे बांगलादेशचा संघ 120 धावात तंबूत परतला. बांगलादेशकडून फरगना हक हिने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. अवघ्या एका धावेनं अर्धशतक हुकले. देविका वैदय हिने तिला तंबूत पाठले. रितू मौनी हिने 27 धावांचे योगदान दिले. या दोघींचा अपवाद वगळता एकाही बांगलदेशाच्या फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशचे आठ फलंदाज दुहेरी धावसंख्या ओलांडू शकले नाहीत. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्स हिने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याशिवा देविका वैदय हिने तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. मेघना सिंह, दिप्ती शर्मा आणि सेन्ह राणा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षठकात आठ विकेटच्या मोबद्लयात 228 धावांपर्यंत मजल मारली. जेमिमा रॉड्रिग्सने सर्वाधिक 86 धावांचे योगदान दिले. जेमिमाने 78 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 86 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 88 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 52 धावांची महत्वाची खेळी केली. त्याशिवाय सलामी फलंदाज स्मृती मांधना हिने 58 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 36 धावा जोडल्या. प्रिया पुनिया हिला फक्त सात धावांचे योगदान देता आले. यात्सिका भाटिया 15, हरलीन देओल 25 धावांचे योगदान दिला. दिप्ती शर्माला खातेही उघडता आले नाही. सेन्ह राणा एका धावावर धावबाद झाली. बांलादेशकडून सुल्ताना खातून आणि नहिदा अख्तर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर मुर्फा अख्तर आणि रुबिया खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
Bangladesh all out for 120 courtesy of a fabulous bowling performance from #TeamIndia 🙌🙌
— BCCI Women (@BCCIWomen) July 19, 2023
India win the second ODI by 108 runs and level the series 1-1 👏🏻👏🏻
Live streaming 📺 - https://t.co/YUBYQ7jnDi
Scorecard - https://t.co/6vaHiS9Qad #BANvIND pic.twitter.com/kZDfjZIkZK