ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe)  यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 रोजी हरारे स्पोर्ट्स क्बल येथे खेळला जाणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मासह (Rohit Sharma) वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यानं के एल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. याचदरम्यान, भारतीय नियामक मंडाळानं म्हणजेच बीसीसीआयनं भारतीय खेळाडूंचा झिम्बाब्वे दौऱ्यातील सराव करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. 

बीसीसीआयनं ट्विटरच्या माध्यमातून केलेल्या पोस्टमध्ये भारतीय खेळाडू मैदानात सराव करताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये भारताचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चहर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांसह अनेक खेळाडू सराव करत आहेत. 

बीसीसीआयची पोस्ट- 

केएल राहुलकडं भारतीय संघाचं नेतृत्व
दीपक चहर दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करत आहे. दिर्घकाळापासून तो संघाबाहेर होता. महत्वाचं म्हणजे, ज्यावेळी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा भारताची धुरा शिखर धवनकडं सोपवण्यात आली होती. परंतु, केएल राहुल दुखापतीतून सावरल्यानं तो झिम्बाब्वे दौऱ्यात भारताचं नेतृत्व करेल, असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं.  

भारत- झिम्बाब्वे एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-

सामना कधी ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब

 

भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

दरम्यान, तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बॉवे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. 


हे देखील वाचा-