Ravindra Jadeja: आयपीएलचा सोळावा हंगाम (IPL 2023) सुरु होण्यापूर्वी चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघाला मोठा धक्का देणारी माहिती समोर आली. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सीएसकेशी असलेलं 10 वर्षांचं जुनं नातं संपवण्याच्या तयारीत आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सीएसके आणि रवींद्र जडेजा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. इनसाइट स्पोर्टच्या अहवालानुसार, रवींद्र जडेजा स्वतःला ट्रेडिंग विंडोमध्ये सूचीबद्ध करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


रवींद्र जडेजानं आता इतर संघांचा पर्याय पाहण्यास सुरुवात केलीय. तसेच रवींद्र जाडेजा आणि चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकारी संपर्कात नसल्याचं समजत आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रवींद्र जाडेजाकडं चेन्नईच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. परंतु, अर्ध्यातूनच त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर दुखापतीमुळं त्याला आयपीएलमधून बाहेर पडावं लागलं होतं. 


जाडेजा- सीएसकेच्या नात्यात दुरावा
दरम्यान, रवींद्र जाडेजानं काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सीएसकेशी निगडीत सर्व पोस्ट हटवल्या होत्या. त्यानंतर धोनीच्या वाढदिवसानिमित्त सीएसकेनं एक पोस्ट केली होती. ज्यात रवींद्र जाडेजा वगळता सीएसकेचे सर्व खेळाडू होते. 


जडेजा- सीएसकेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता
इनसाइट स्पोर्टनं दिलेल्या माहितीनुसार, जडेजाचे मॅनेजर इतर संघांशी ट्रेडिंग ऑफरबाबत चर्चा करत आहेत. महत्वाचं म्हणजे, ट्रेडिंग विंडोचा भाग झाल्यानंतरच जडेजा इतर संघांशी बोलू शकतो. पण त्याआधी जडेजा आणि सीएसकेच्या अधिकाऱ्यांमध्येही बैठक घेण्याची शक्यता आहे.


जाडेजा दहा वर्षांपासून सीएसकेचा भाग
मिळालेल्या माहितीनुसार, असं म्हटलं जातंय की रवींद्र जाडेजानं सीएसकेचा संघ सोडण्याचा निश्चय पक्का केलाय. आयपीएलच्या मागच्या हंगामात त्याच्यासोबत जे काही घडलं? ज्यामुळं तो दु:खी झालाय. एवढेच नव्हे तर, तो इतर संघाचा पर्यायही शोधत आहे. रवींद्र जाडेजा 2012 मध्ये चेन्नईच्या संघात सामील झाला होता. आयपीएलच्या मागच्या हंगामात रवींद्र जाडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद रवींद्र जाडेजाकडं सोपवलं होतं. परंतु यादरम्यान ना संघ चांगली कामगिरी करू शकला ना जडेजा. जडेजा फलंदाजी आणि गोलंदाजीतही मैदानावरही संघर्ष करताना दिसला. 


हे देखील वाचा-