ZIM vs IND: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाव्बे दौऱ्यावर गेलाय. झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, तरीही भारतीय संघात कोणतीही कमतरता जाणवत नाहीये. याच पार्श्वभूमीवर झिम्बाब्वेचा फलंदाज इनोसेन्ट कायानं (Innocent Kaia) या मालिकेत भारताचा पराभव होईल, अशी भविष्यवाणी केलीय. 


बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील विजयानंतर झिम्बाब्वे संघ उत्साह आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघानं यजमान झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, असा इशारा झिम्बाब्वेच्या प्रशिक्षकानं भारताला दिलाय. त्यानंतर इनोसेन्ट कायानं झिम्बाब्वेचा संघ भारताला 2-1 नं पराभूत करेल, अशी भविष्यवाणी केलीय. 


इनोसेन्ट काया काय म्हणतो?
एका इंग्रजी चॅनली बोलताना इनोसेन्ट काया म्हणाला की, झिम्बाब्वेचा संघ भारताविरुद्ध 2-1 च्या फरकानं एकदिवसीय मालिका जिंकेल. जोपर्यंत वैयक्तिक अपेक्षांचा प्रश्न आहे, मला सर्वाधिक धावा आणि शतके झळकावायची आहेत. ही एक साधी योजना आहे. मालिकेतील सर्वात यशस्वी फलंदाज होण्यासाठी मला फक्त धावा करायच्या आहेत. तेच माझे ध्येय असणार आहे.


भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता यजमान झिम्बाब्वेसाठी फायदेशीर ठरू शकते, असं मत यावर्षी पदार्पण करणाऱ्या इनोसेन्ट कायानं व्यक्त केलंय. 


भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा विश्वास
"ज्यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंना विश्रांती दिली जाते, तेव्हा भारतीय खेळाडू गंभीरतेनं क्रिकेट खेळतात. मला माहित आहे की, झिम्बाब्वेमध्ये आलेला भारतीय संघ मजबूत आहे. त्यांच्याविरुद्ध खेळणे सोपे आहे असं सांगून आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. मला खात्री आहे की, मी त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी करेल.


बांग्लादेशविरुद्ध झिम्बाब्वेची दमदारी कामगिरी
नुकतीच बांग्लादेशविरुद्ध झिम्बाब्वेनं दमदार कामगिरी केली होती. बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेनं 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इनोसेन्ट कायानं शतक झळकावलं होतं. या सामन्यात इनोसेन्ट काया आणि सिकंदर रजानं चौथ्या विकेट्ससाठी 192 धावांची भागेदारी केली होती. या सामन्यात 135 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या सिकंदर रजाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. 


हे देखील वाचा-