टीम इंडियानं (Team India) जागतिक क्रिकेटला अनेक महान खेळाडू दिले आहेत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचाही समावेश आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 1983 मध्ये वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून पहिला एकदिवसीय विश्वचषक (1983 World Cup) जिंकला होता. भारतात क्रिकेटला उंचीवर नेण्यास कपील देव यांचा मोलाचा वाटा आहे. कपिल देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे, कपिल देव हे त्यांच्या कसोटी कारकिर्दीत कधीच रन आऊट झाले नाहीत.
जगभरातील महान क्रिकेटपटूंच्या यादीत कपिल देव यांची गणना केली जाते. कपिल देव यांनी 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. कपिल देव यांनी 131 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी 5 हजार 248 धावा आणि 434 विकेट्स घेतल्या आहेत. याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये कपिल देव यांच्या नावावर 3000 हून अधिक धावा आणि 253 विकेट्सची नोंद आहे. कपिल देव यांनी उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर जगभरात आपली छाप सोडली होती. अनेक फलंदाज त्यांच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करायचे.
कसोटी क्रिकेटमध्ये रन आऊट न झालेले फलंदाजकपिल देव त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीच रन आऊट झाली नाही. पण कपिल देव यांच्या व्यतिरिक्त इतर अन्य चार फलंदाजही आहेत, जे त्यांच्या कारकिर्दीत कधीच रन आऊट झाले नाहीत. या यादीत इंग्लंडचा माजी कर्णधार पीटर मीन, झिम्बाब्वेमध्ये जन्मलेला आणि इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा ग्रॅमी हिक, पाकिस्तानचा मुदस्सर नाझर यांचा समावेश आहे. इंग्लंडचा पॉल कॉलिंगवूडचाही या यादीत समावेश आहे.
1983 च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार1983 चा विश्वचषक विजय म्हणजे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णक्षण म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. या विजयाने भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहराच जणू बदलला. अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवून इतिहास रचला. भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटला एक नवी उंची प्रदान करुन दिली होती.
'83' कपिल देव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटकपिल देव यांच्या जीवनावर आधारीत '83' चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. ज्यात बॉलिवूड स्टार रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती.
हे देखील वाचा-
MS Dhoni: धोनीनं निवृत्तीसाठी 7.29 ही वेळ का निवडली? यामागचं गुपीत घ्या जाणून
Ravindra Jadeja: रवींद्र जाडेजाचं सीएसकेतून बाहेर पडणं जवळपास निश्चित, महत्वाची माहिती आली समोर