IND vs ZIM : शुभमन गिल अन् ऋतुराज गायकवाडची दोनदा विकेट काढली, झिम्बॉब्वेच्या गोलंदाजाला आयपीएलची लॉटरी लागणार?
IPL 2025 : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील 5 सामन्यांची टी 20 मालिका नुकतीच पार पडली. यामध्ये भारतानं 4-1 असा विजय मिळवला.
हरारे : शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाच्या (Team India) यंग ब्रिगेडनं झिम्बॉब्वेला (Zimbabwe) पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत 4-1 असं पराभूत केलं. शुभमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्त्वात भारताची यंग ब्रिगेड झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात भारताकडून अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन यांनी चांगली कामगिरी केली. टीम इंडियानं मालिका एकतर्फी जिंकली असली तरी झिम्बॉब्वेसाठी ही मालिका देखील महत्त्वाची ठरली. कारण झिम्बॉब्वेनं या मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये भारताला 13 धावांनी पराभूत केलं होतं. झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांनी या मालिकेत चांगली कामगिरी केली. भारताचा कॅप्टन शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना दोनवेळा बाद करणाऱ्या ब्लेसिंग मुजरबानी (Blessing Muzarabani) याला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. झिम्बॉब्वेचा खेळाडू थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या हेड कोचनं यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे हेड कोच अँडी फ्लॉवर यांनी यासंदर्भात मोठे संकेत दिले आहेत. 2025 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून ब्लेसिंग मुजरबानीला संधी दिली जाऊ शकते. अँडी फ्लॉवर यांनी दिलेल्या संकेताप्रमाणं घडामोडी घडल्यास झिम्बॉब्वेचा गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी विराट कोहलीसोबत खेळताना पाहायला मिळू शकतो. मात्र, ब्लेसिंग मुजरबानी याला संधी द्यायची की नाही याचा अंतिम निर्णय विराट कोहली आणि आरसीबीची मॅनेजमेंट घेऊ शकते.
झिम्बॉब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानी यानं टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 56 मॅचेस खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 66 विकेट काढल्या आहेत. टी 20 मध्ये ब्लेसिंग मुजरबानी यानं 7.22 च्या इकोनॉमीनं गोलंदाजी केलेली आहे. आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. आरसीबीनं 2024 च्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. गोलंदाजीची बाजू भक्कम करण्यासाठी आरसीबी ब्लेसिंग मुजरबानीला संधी देऊ शकते.
ऋतुराज गायकवाड अन् शुभमन गिलची दोनदा विकेट
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्या मालिकेत आरसीबीचा कोच असलेला अँडी फ्लॉवर कॉमेंट्री करत होता. यावेळी त्यांनी सहकाऱ्यांना मुजरबानीला आयपीएलमध्ये संधी मिळावी का असा प्रश्न विचारला. मुजरबानी यानं भारताविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेत 6 विकेट घेतल्या. या दौऱ्यात त्यानं 6.11 च्या इकोनॉमीनं गोलंदाजी केली. विशेष बाब म्हणजे आयपीएलमधील स्फोटक फलंदाज असलेल्या शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना त्यानं दोनवेळा बाद केलंहोतं.
दरम्यान , रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये मोहम्मद सिराज, आकाशदीप, रीस टॉप्ली यांच्यासह इतर गोलंदाज आहेत. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ब्लेसिंग मुजरबानीला संधी मिळते का ते पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :
IND vs ZIM : आधी सॅमसनने फोडलं, मग गोलंदाजांनी रोखलं, भारताचा झिम्बाब्वेवर 42 धावांनी विजय